Mithali Raj on strike rate: महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने स्ट्राइक रेटबाबत आपले मत मांडले आहे. माहितीसाठी की टी२० इंटरनॅशनलमध्‍ये ३० पेक्षा जास्त सरासरी असलेली ती एकमेव भारतीय महिला क्रिकेटर आहे. वास्तविक मिताली राज नुकतीच अनकॅप्ड क्रिकेटर आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेबद्दल बोलताना दिसली. सध्या आयपीएल २०२३ मध्ये स्टार स्पोर्ट्सवर समालोचकाच्या भूमिकेत काम करताना दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी२० फक्त स्ट्राइक रेट महत्त्वाचा नसतो- मिताली राज

बंगळुरूच्या सामन्यानंतर प्रसारमाध्यमांनी तिला काही प्रश्न विचारलेले त्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवरही एक प्रश्न होता. की, “टी२० मध्ये विराट कोहलीसारखे खेळाडू मधल्या षटकांमध्ये संघर्ष करताना का दिसतात?” यावर उत्तर देताना मिताली राज म्हणाली की, “प्रत्येक खेळाडू हा वेगळा असतो. प्रत्येक फलंदाजाची शैली, तंत्र हे वेगळे असते. खरं तर, तो पॉवर हिटिंगपेक्षा चौकार, षटकारापेक्षा विकेट्सच्या दरम्यान एकेरी-दुहेरी धावांवर जास्त अवलंबून असतो. यामुळे धावफलक हलता राहतो आणि गोलंदाजाची लय तुटते. जेणेकरून टायमिंगनुसार मोठे फटके मारण्यास सोयीचे होते. तो या आयपीएलची ज्या प्रकारे सुरुवात करतोय ते विलक्षण आहे. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असावी.”

हेही वाचा: IPL 2023: आधी शिवीगाळ नंतर माफी! राजस्थानच्या सामन्यात मोहम्मद सिराजने अशा पद्धतीने राग काढला की…

मिताली पुढे म्हणाली की, “या मोसमात आम्ही फिरकीपटूंविरुद्ध कोहलीचा स्ट्राइक रेट कमी झालेला पाहिला आहे. यामागचे कारण वेगवान गोलंदाजांविरुद्ध तुमचे फुटवर्क वेगळे असते आणि फिरकीपटूंच्या विरोधात फलंदाजी करताना ते वेगळे आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते. पहिल्या सहा षटकांनंतर खेळ बदलतो, पॉवर प्ले नंतर सीमारेषेजवळ अधिक क्षेत्ररक्षक असतात. अशावेळी स्ट्राइक रेट थोडा कमी होतो, मोठ्या मैदानावर फिरकीपटूंना फलंदाजांना बाद करण्यासाठी अधिक संधी मिळते.  पण कोहलीचा स्ट्राइक रेट खूप कमी नाही आहे.”

टी२० मधील स्ट्राईक रेट आणि सरासरी याविषयी बोलताना मिताली राज म्हणाली की, “दोन्ही महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही धावा करत असाल तर तुमच्याकडून जास्त धावा आणि स्ट्राइक रेट चांगला असणे अपेक्षित आहे. तुम्ही कुठे फलंदाजी करता यावर ते अवलंबून असते कारण तुम्ही सलामीवीर असाल तर तुम्हाला पॉवरप्लेमध्ये खूप मेहनत करावी लागेल. त्या जागेवर जास्तीत जास्त धावा करण्याची उत्तम संधी असते.”

हेही वाचा: जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत: नेपोम्नियाशी-डिंगची ११व्या डावात बरोबरी

यामुळे अष्टपैलूची भूमिका कमी होते- मिताली राज

भारताची माजी महिला कर्णधार म्हणाली की, “जर खेळपट्टी अवघड असेल आणि तुम्ही विकेट गमावत असाल तर त्या वेळेला फक्त स्ट्राइक रेटवर अवलंबून राहू शकत नाही. मग तुम्ही तुमच्या संघाची त्यावेळी असणारी गरज लक्षात घेऊन परिस्थितीनुसार फलंदाजी करायला हवी. यासोबतच तिने इम्पॅक्ट प्लेअरबद्दल बोलताना सांगितले की, “यामुळे अष्टपैलूची भूमिका कमी होते. जर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअर असाल तर आम्ही या आयपीएलमध्ये पाहिले आहे की फलंदाजीचा क्रम ९व्या क्रमांकापर्यंत जातो.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithali raj expressed her opinion about the strike rate said it is important but in t20 cricket it does not affect avw
Show comments