चेन्नई आणि बंगळुरु सामन्यामध्ये चेन्नईने धावांचा डोंगर उभा केला. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने १६५ धावांची भागिदार करत बंगळुरुसमोर २१७ धावांचे आव्हान उभे केले. असे असले तरी बंगळुरु संघाने चेन्नईच्या मोईन अलीला ज्या पद्धतीने बाद केलं, त्याची चर्चा होत आहे. सुयश प्रभुदेसाईने चपळाई दाखवत यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकल्यामुळे मोईन अलीला धावबाद व्हावं लागलंय.

मोई अली कसा बाद झाला ?

सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड अवघ्या १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मोईन आली मोठी खेळी करेल अशी आशा होती. मात्र चेन्नईच्या ३६ धावा असताना मोईन अली धावबाद धाला. त्याने सातव्या षटकात फटका मारुन धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुयश प्रभुदेसाईने झेप घेत चेंडू पकडला आणि क्षणात यष्टीरक्षकाकडे फेकला. चेंडू यष्टीरक्षकाकडे येईपर्यंत मोईन अलीने धावपट्टीवर अर्धे अंतर कापले होते. त्यामुळे परत क्रीजमध्ये येईपर्यंत यष्टीरक्षकाने स्टंप्स चेंडूने उडवले होते. प्रभुदेसाईचे भन्नाट क्षेत्ररक्षण आणि दिनेश कार्तिकची चपळाई यामुळे मोईन अलीला अवघ्या तीन धावांवर बाद व्हावं लागलं.

दरम्यान, मोईन अली बाद झाल्यानंतर मात्र रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने १६५ धावांची दीड शतकी भागिदारी केली. उथप्पाने ८८ धावा केल्या. तर शिवम दुबचे पाच धावांअभावी शतक हुकले. दुबेने ९५ धावा केल्या. दोघांच्या या खेळीमुळे चेन्नईने २१६ धावांचा डोंगर ऊभा केला.

Story img Loader