Mohammad Siraj Reveals About Sledging: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने गेल्या काही मालिकांमध्ये टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये तो जगातील नंबर वन गोलंदाज बनला. केवळ चेंडूनेच नाही तर शब्दानेही मैदानावर फलंदाजांना त्रास देणारा खेळाडू म्हणून सिराजला ओळखले जाते. सिराज अनेकदा विरोधकांवर स्लेजिंग करताना दिसतो. आता मोहम्मद सिराजने आपल्या यशाबद्दल आणि स्लेजिंगबाबत एक खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिराजने स्लेज का करायचे ते सांगितले –

सिराजने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या विकेट घेण्यामागे स्लेजिंग हे मुख्य कारण आहे. तो स्लेजिंग करून खेळाडूचे लक्ष विचलित करतो आणि नंतर विकेट मिळवतो. गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये तो म्हणाला, ‘जर तुम्ही त्यांना स्लेज केले नाही, तर तुम्हाला विकेट मिळणार नाहीत, असे मला वाटते. फलंदाजांचे लक्ष विचलित करण्यासाठी फलंदाजाला काहीतरी बोलून तुम्हाला काही खोडसाळपणा करावा लागेल, तरच फलंदाज नाराज होऊन चुकीचा शॉट खेळेल. अन्यथा तो बचाव करत राहील.’

बुमराह वेगळ्या पद्धतीने राग दाखवतो –

यानंतर जसप्रीत बुमराह स्लेजिंगशिवाय विकेट कसा घेतो, असा सवाल गौरव कपूरने केला. यावर उत्तर देताना सिराजने म्हणाला, ‘तो आतून रागावेल. जर फलंदाजाने चेंडू सोडला किंवा बचाव केला तर त्याला खूप राग येतो. त्यानंतर ते पुन्हा हल्ला करतो.’ भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत सध्या दुखापतीमुळे टीम इंडिया आणि आयपीएल २०२३ मधून बाहेर आहे.

हेही वाचा – SRH vs LSG: गौतम गंभीरसमोर प्रेक्षकांनी दिल्या ‘कोहली-कोहली’च्या घोषणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

जेम्स अँडरसनलाही सिराजने स्लेजिंग केली होती –

सिराजने इंग्लंडच्या स्लेजिंगचा किस्साही सांगितला. जेव्हा तो आणि बुमराह फलंदाजी करत होते, तेव्हा जेम्स अँडरसनने त्याच्याशी गैरवर्तन केल्याचे त्याने सांगितले. यामुळे सिराज चांगलाच संतापला. जेव्हा अँडरसन फलंदाजीला आला, तेव्हा सिराज त्याला म्हणाला, ‘तू ६०० विकेट घेतल्या असतील, पण मला त्याची पर्वा नाही. कारण तू माझा आदर करत नाहीस’. हे ऐकून अँडरसन चांगलाच संतापला आणि त्याने विराट कोहलीकडे जाऊन सिराजची तक्रार केली होती.

हेही वाचा –

मोहम्मद सिराजबद्दल बोलायचे, तर तो सध्या आयपीएल २०२३ मध्ये व्यस्त आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या संघाचा आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना आहे. हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad siraj himself has revealed why he sledging the opposition batsmen vbm