Mohammed Shami criticizes Sanjeev Goenka : आयपीएल टीम लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. एलएसजी आणि एसआरएच यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात लखनऊ संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात संपूर्ण लखनऊ संघाची कामगिरी खराब राहिली. या सामन्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि संजीव गोयंका चर्चा करताना दिसले. यादरम्यान गोयंका राहुलवर भडकतानाही दिसले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीनेही संजीव गोयंकावर टीका केली आहे.

मोहम्मद शमीची संजीव गोयंकावर परखड भाषेत टीका –

या संपूर्ण प्रकरणावर मोहम्मद शमीने क्रिकबझशी सविस्तर संवाद साधला आहे. शमी म्हणाला, “खेळाडूंचा आदर आहे आणि तुम्ही मालक आहात म्हणून तुम्हीही आदरणीय व्यक्ती आहात. बरेच लोक तुम्हाला पाहत आहेत आणि तुमच्याकडून शिकत आहेत. कॅमेऱ्यासमोर असे प्रकार घडत असतील तर ही शरमेची बाब आहे. जर तुम्हाला हे करायचे होते, तर ते करण्याचे इतर मार्ग आहेत. तुम्ही हे ड्रेसिंग रूम किंवा हॉटेलमध्ये करू शकता. मैदानावर हे करण्याची गरज नव्हती. असे करून तुम्ही काय लाल किल्ल्यावर झेंडा रोवला नाही.”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

‘अशा वर्तनातून खूप चुकीचा संदेश जातो’ –

मोहम्मद शमीने केएल राहुलची बाजू घेतली आणि म्हणाला, “तो एक कर्णधार आहे सामान्य खेळाडू नाही. हा सांघिक खेळ आहे. योजना यशस्वी झाली नाही, तर त्यात फार मोठे काही नाही. खेळात काहीही शक्य आहे. त्यामुळे मला वाटते या खेळात चांगले किंवा वाईट दिवस असू शकतात. पण खेळाडूंचा आदर केला जातो आणि बोलण्याची पण एक पद्धत असते. अशा वर्तनातून खूप चुकीचा संदेश जातो.”

हेही वाचा – PBKS vs RCB : विराट कोहलीने रायली रुसोच्या सेलिब्रेशनची नक्कल करत दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल

हैदराबादकडून लखनऊचा दारुण पराभव –

आता केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजी संघाला प्लेऑफचे तिकीट मिळवायचे असेल, तर त्यांना पुढील दोन सामने जिंकावे लागतील. इतकेच नाही तर इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या दोन मोसमात चमकदार कामगिरी केली होती. दोन्ही हंगामात लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. पण यंदाच्या हंगामात संघाची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. लखनऊ संघाने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीच्या वादळी खेळीच्या जोरावर अवघ्या ९.४ षटकांत लक्ष्य गाठले आणि १० विकेट्सनी लखनऊचा दारुण पराभव केला.

Story img Loader