Virat Kohli Reaction Goes Viral : आयपीएल २०२३ च्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर ८ विकेट्सने विजय मिळवला. परंतु, या सामन्यात एक रोमांचक मोड पाहायला मिळाला. रोहित शर्मा एका धावेवर फलंदाजी करत असताना त्याचा झेल उडाला. परंतु, खेळपट्टीच्या पाठीमागे असलेला विकेटकीपर दिनेश कार्तिक आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा झेल घेताना गोंधळ उडाला आणि दोघांची एकमेकांना टक्कर झाली.
रोहितने सिराजच्या गोलंदाजीवर मारलेला चेंडू खूप उंच उडाला होता. त्यामुळे चेंडूवर दोन्ही खेळाडूंच्या नजरा भिडल्या होत्या. पण वेळेचं गणित चुकल्याने दोघांची टक्कर झाली आणि ते मैदानात पडले. दोघांचा अंदाज चुकल्याने रोहित शर्माचा झेल सुटला. त्यानंतर विराट कोहलीने संतापजनक रिअॅक्शन दिली. रोहितचा झेल सुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
रोहित शर्माने सिराजच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारल्यानंतर चेंडू उंच उडाला. त्यानंतर कार्तिकने हाताने इशारा करत गोलंदाजाला चेंडूच्या पाठीमागे धावण्यापासून रोखलं होतं, पण कार्तिकच्या इशाऱ्याकडे सिराजचं दुर्लक्ष झाल्याने दोघांची टक्कर झाली. त्यानंतर दोघेही मैदानात खाली पडले आणि झेल सुटला. हे सर्व घडल्यानंतर विराट कोहलीने दोघांच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. झेल सुटल्यानंतर कोहलीने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. परंतु, रोहितला मिळालेल्या जीवदानाचा तो फायदा करू शकला नाही. कारण पुढच्या षटकात रोहित लगेच बाद झाला.
कोहली आणि फाफ डु प्लेसिसचा जलवा
सामन्यात कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतकी खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. कोहलीने ८२ धावांची नाबाद खेळी केली. तर फाफने ७२ धावांची खेळी साकारली.