आयपीएलचा लीग टप्पा आता अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील ७० पैकी ६३ सामने झाले आहेत. मंगळवारी (१६ मे) झालेल्या ६३व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. १३ सामन्यांत त्याचे १५ गुण आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने मुंबईविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. मोहसीनने खुलासा केला की त्याचे वडील नुकतेच १० दिवस आयसीयूमध्ये दाखल होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तर प्रदेशातील २४ वर्षीय मोहसिनने गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती परंतु यावेळी तो डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे अनेक सामने खेळू शकला नाही. गेले १० महिने त्याच्यासाठी खूप कठीण गेले. स्वत: मोहसीन बराच वेळ दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. यामुळे तो संपूर्ण देशांतर्गत हंगामात खेळू शकला नाही. त्यानंतर आयपीएल २०२३च्या बहुतांश सामन्यांपासून दूर राहावे राहिले. मग वडिलांच्या आजारपणाने त्यांची काळजी वाढली. यासर्व संकटांवर मात करत कालच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला सनसनाटी विजय मिळवून दिला.

टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यांना ११ धावा करू दिल्या नाहीत

आयपीएलच्या चालू मोसमातील मोहसिनचा हा दुसरा सामना होता. शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला विजयासाठी ११ धावा करायच्या होत्या. लखनऊचा कर्णधार क्रुणालने मोहसिनला गोलंदाजीसाठी बोलावले. त्याच्यासमोर टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन हे दोन विस्फोटक फलंदाज होते. मोहसीनने चमकदार कामगिरी करत दोघांनाही ११ धावा करू दिल्या नाहीत. त्याने आपल्या शानदार यॉर्करने संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL2023: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात क्रुणाल पांड्याने चीटिंग केली? रविचंद्रन अश्विनचा रिटायर्ड हर्टवरून थेट सवाल

मोहसीनने संघ व्यवस्थापनाचे आभार मानले

मोहसीन सामन्यानंतर म्हणाला, “हा कठीण काळ होता कारण मी एका वर्षानंतर खेळत होतो. माझ्या वडिलांना काल आयसीयूमधून डिस्चार्ज मिळाला. गेल्या १० दिवसांपासून ते रुग्णालयात होते. मी हे सर्व त्यांच्यासाठी केले. त्यांना मी हे मोठे गिफ्ट दिले आहे आणि ते नक्की पाहत असावेत. मला या सामन्यात संधी दिल्याबद्दल संघ आणि सपोर्ट स्टाफ, गौतम गंभीर सर, विजय दहिया सरांचे आभार. माझ्या शेवटच्या सामन्यात मी चांगली कामगिरी केली नाही.”

स्कोअरबोर्ड बघत नव्हतो : मोहसीन

अंतिम षटकातील आपल्या प्लॅनबद्दल बोलताना मोहसिन म्हणाला, “मी सरावात जे केले तेच प्लॅनिंग होते. अगदी क्रुणालही माझ्याशी बोलत होता आणि मी त्याला तेच सांगितले. बॉलिंग रनअप तसाच ठेवला. शेवटचे जे षटक टाकले त्यात मी विशेष असे काहीही केले नाही. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि धावफलकाकडे बघितले देखील नव्हते. सहा चेंडू चांगले टाकू हाच विचार करत लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत होतो. मी स्लोअर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काही चेंडू यॉर्करमध्ये रूपांतरित केले. चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला यामुळेच आम्हाला यश मिळाले.”

हेही वाचा: IPL Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल! कोहली, धवनचा संघ एमआय पलटणला देणार का धोबीपछाड? जाणून घ्या समीकरण

मोहसीनचा विक्रम

मोहसीनने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला आतापर्यंत एक प्रथम श्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली असून दोन विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए मध्ये मोहसीनने १७ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत.