MS Dhoni Creates History With Markram’s Catch: आयपीएल २०२३ च्या २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने एसआरएचवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ७ गडी गमावून १३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. दरम्यान या सामन्यात एमएस धोनीने एका मोठ्या विक्रमाल गवसणी घातली आहे.

एमएस धोनीने मार्करामचा झेल घेत इतिहास रचला –

एमएस धोनीने हैदराबादविरुद्ध विकेटच्या मागे दोन शिकार केल्या. त्याने हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामला महेश तिक्षणाच्या गोलंदाजीवर झेलबाद केले, त्याचबरोबर मयंक अग्रवालला रवींद्र जडेजाने आश्चर्यकारक गतीने यष्टिचित केले. या एका झेलसह धोनी आता पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये विकेटच्या मागे सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक बनला आहे. क्विंटन डिकॉकला मागे टाकत त्याने ही कामगिरी केली आहे. त्याचवेळी, आयपीएलमध्ये, विकेटच्या मागे २०० फलंदाजांची शिकार करणारा तो पहिला यष्टीरक्षक बनला आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक –

२०८ – एमएस धोनी
२०७ – क्विंटन डी कॉक
२०५ – दिनेश कार्तिक<br>१७२ – कामरान अकमल
१५० – दिनेश रामदिन

हेही वाचा – CSK vs SRH: सीएसकेने लगावला विजयी चौकार; डेव्हॉन कॉनवेच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईची हैदराबादवर ७ गडी राखून मात

रवींद्र जडेजा हेन्रिक क्लासेनवर भडकला –

या सामन्याच्या पहिल्या डावातील १४ वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा आला. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवालला आपला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पाडले. मयंकने असा चेंडू खेळल्यानंतर रवींद्र जडेजाच्या दिशेने एक सोपा झेल आला, पण त्यानंतर दुसऱ्या टोकाला उभा असलेला हेनरिक क्लासेन चेंडूच्या मध्यभागी आला आणि जडेजाला तो झेल घेता आला नाही. मात्र, क्लासेनने स्वत:ला वाचवण्यासाठी बॉलकडे पाठ वळवली होती आणि जडेजा हा झेल घेऊ शकला नाही. यानंतर जडेजा त्याच्यावर चांगलाच रागावलेला दिसत होता.

त्यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मयंक अग्रवाल जडेजाचा चेंडू खेळण्यासाठी क्रीजच्या खूप पुढे गेला. त्यानंतर विकेटच्या मागे उभ्या असलेल्या एमएस धोनीने त्याला वेगवान गतीने यष्टिचित केले. यानंतर जडेजाने क्लासेनकडे पाहिले आणि हातवारे केले. ही विकेट मिळाल्यानंतर जडेजा खूपच आक्रमक दिसत होता आणि त्याच्या देहबोलीतून त्याने बदला घेतल्यासारखे वाटत होते.

Story img Loader