MS Dhoni Made History CSK vs SRH match: आयपीएल २०२४च्या ४६व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादच्या रेकॉर्डब्रेक धावसंख्येचा दबदबा धुळीस मिळवला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने हैदराबादवर तब्बल ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह एमएस धोनीने आयपीएलमध्ये इतिहास रचला. त्याने अशी कामगिरी आपल्या नावे केली आहे, जी आजवर कोणालाही जमली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एमएस धोनीचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम

एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २५९ सामने खेळले आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूचा विक्रम धोनीच्या नावे आहे. यापैकी १५० विजयी झालेल्या सामन्यांमध्ये धोनी संघाचा भाग होता. म्हणजेच तो आयपीएलच्या इतिहासात १५० सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत आतापर्यंत कोणताही खेळाडू एमएस धोनीपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू
एमएस धोनी – १५० विजय
रोहित शर्मा – १३३ विजय
रवींद्र जडेजा – १३३ विजय
दिनेश कार्तिक – १३५ विजय
सुरेश रैना – १२२ विजय

एमएस धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३९.५३ च्या सरासरीने ५१७८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. एमएस धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या मोसमात धोनीची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. धोनीचा स्ट्राईक रेट हा आयपीएल २०२४ मध्ये २५९.४६ इतका आहे, जो दुसरा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे. याचसोबत धोनीने ९ पैकी ७ सामन्यांमध्ये फलंदाजी करत ९६ धावा केल्या आहेत, ज्यात एकदाही आऊट होऊन परतला नाही.