MS Dhoni becomes 1st wicketkeeper in the world to dismiss 300 batsmen : आयपीएल २०२४ च्या १३व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने इतिहास रचला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने पृथ्वी शॉला विकेटच्या मागे झेलबाद केले. यासह त्याने टी-२० मध्ये ३०० फलंदाजांना यष्टीच्या मागे बाद केले आहे. ही कामगिरी करणारा धोनी पहिला यष्टिरक्षक ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएस धोनीने रविवारी विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक मोठी कामगिरी केली. धोनीने पृथ्वी शॉचा सोपा झेल घेतला आणि टी-२० क्रिकेटमध्ये ३०० फलंदाजांना बाद (कॅच + स्टंप) करणारा पहिला यष्टिरक्षक बनला. चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज खेळाडूने दिनेश कार्तिक आणि क्विंटन डी कॉकसारख्या दिग्गजांना मागे टाकत ही कामगिरी केली.

या यादीत कामरान अकमल दुसऱ्या स्थानावर –

धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३०० फलंदाजांना यष्टीच्या मागे बाद केले आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक फलंदाजांना यष्टीच्या मागे बाद करणारऱ्या इतर यष्टिरक्षकांबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानचा कामरान अकमल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत दिनेश कार्तिक तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक चौथ्या आणि इंग्लंडचा जोस बटलर पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – GT vs SRH : राशिद खानने शमीचा विक्रम मोडत रचला इतिहास, गुजरातसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारे यष्टीरक्षक –

३०० – महेंद्रसिंग धोनी<br>२७४ – कामरान अकमल
२७४ – दिनेश कार्तिक
२७० – क्विंटन डी कॉक
२०९ – जोस बटलर

हेही वाचा – CSK vs DC : मथीशा पाथिरानाने वॉर्नरचा घेतला एका हाताने अप्रतिम झेल, धोनीसह संपूर्ण स्टेडियम झाले चकीत, पाहा VIDEO

महेंद्रसिंग धोनीची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी –

मएस धोनीच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३७९ सामन्यांच्या ३३१ डावांमध्ये ७२७१ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने २८ अर्धशतके केली आहेत. जर आपण आयपीएलमधील माहीच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत २५१ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ३८.७९ च्या सरासरीने आणि १३५.९२ च्या स्ट्राइक रेटने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर या लीगमध्ये २४ अर्धशतके आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या मोसमात धोनीला दोन्ही सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही.