MS Dhoni Discussion With Umpire Video Viral : आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या चेपॉक स्टेडियममध्ये रंगला. या सामन्यात सीएसकेनं गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात गुजरातचा पराभव झाला असला, तरीही त्यांच्या संघ आयपीएलमधून बाहेर गेला नाही. चेन्नईशी फायनलमध्ये लढत करण्यासाठी गुजरातला आणखी एक संधी आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात जो संघ विजयी होईल, त्या संघाविरुद्ध गुजरातचा सामना होईल. तत्पूर्वी, चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं जबरदस्त कॅप्टन्सी केल्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चेन्नईनं दिलेल्या १७३ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला अन् १५ व्या षटकात एक रोमांच पाहायला मिळाला. धोनी अंपायरसोबत चर्चा करत असल्याचं समोर आलं. मैदानात नेमका काय गोंधळ उडाला होता, हे सुरुवातीला स्पष्ट झालं नव्हतं. पण काही वेळानंतर सर्वांच्या लक्षात आलं की, वेळ पुढं नेण्यासाठी धोनीनं चालाखी केली होती. मथिशा पाथिराना गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आल्यावर अंपायरने त्याला परवानगी दिली नाही.

नक्की वाचा – एम एस धोनी ‘त्या’ रात्री ढसाढसा रडला, हरभजन सिंगने सांगितला CSK च्या पार्टीतील ‘तो’ किस्सा, पाहा Video

कारण तो मैदानावर काही वेळासाठी उपस्थित नव्हता. परंतु, त्याचदरम्यान, धोनीनं हुशारी दाखवत अंपायरला काही वेळ चर्चांमध्ये अडकवून ठेवलं. तोपर्यंत सीएसकेचा दुसरा खेळाडू मैदानात पोहोचला होता. पाथिरानाला गोलंदाजी देण्यापूर्वी चार मिनिटं मैदानात हा गोंधळ उडाला होता. यावर टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, जरी अंपायरने गंभीर परिस्थितीत एखाद्या वेळी चुकीचा निर्णय दिला. तरीही तू अंपायरचा निर्णय स्विकारतो.