पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढत चांगलीच अटीतटीची ठरली. विजय आणि पराभव या व्यतीरिक्त हा सामना अनेक कारणांमुळे संस्मरणीय ठरला. कारण या सामन्यात पंजाबचा दिग्गज फलंदाज शिखर धवनने त्याच्या नावावर दोन विक्रम नोंदवले. तर या हंगामामध्ये पहिल्याच सामन्यात खेळणाऱ्या पंजाबच्या ऋषी धवनने गोलंदाजीमध्ये धडाकेबाज कामगिरी केली. या सामन्याला पंजाब किंग्जची मालकीण अभिनेत्री प्रीति झिंटानेही हजेरी लावली होती. अशा अनेक कारणामुळे या सामन्याची चांगलीच चर्चा झाली. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान महाराष्ट्रीतील कोल्हापूर जिल्हादेखील चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा >> प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ११ धावांनी पराभव झाला. सामन्यादरम्यान चेन्नईला चांगली कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी चेन्नईच्या चाहत्यांनी परिसर अक्षरश: दणाणून सोडला होता. पिवळी जर्सी परिधान करून चेन्नईचे चाहते महेंद्रसिंह धोनीचा जयजयकार करत होते. धोनी या सामन्यात आपली कमाल दाखवू शकला नाही. मात्र त्याचा जयजयकार काही कमी झाला नाही. यावेळी वानखेडे स्टेडियमवर धोनीचे वेड असलेला कोल्हापूरचा एक जबरा फॅनही झळकला. लाखो प्रेक्षकांमध्ये त्याची उपस्थिती सर्वांसाठीच खास ठऱली. या कोल्हापुरी फॅनने महेंद्रसिंह धोनीबद्दल प्रेम व्यक्त करणारे एक खास पोस्टर आपल्या हातात घेतले होते.

हेही वाचा >> IPL 2022, RCB vs RR : आज राजस्थान-बंगळुरु आमनेसामने, विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

पिवळी जर्सी आणि पिवळ्या रंगाचा फेटा परिधान करून मूळचा कोल्हापूरचा असलेला एक प्रेक्षक धोनीसाठी चिअर करत होता. त्याच्या हातात विशेष पोस्टर होते. धोनीच्या पेन्सिल स्केचसोबत त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करणारा मजकूर या पोस्टरवर लिहिलेला होता. विशेष म्हणजे कोल्हापूरचेही नाव यावर विशेषत्वाने लिहिलेले होते. प्रिय धोनी कोल्हापूरमधून खूप प्रेम अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर लिहण्यात आला होता. खास कोल्हापूरमधून आलेल्या धोनीच्या या चाहत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा >> PBKS vs CSK : ऋषी धवनच्या फेस शिल्डवरुन वसीम जाफरने रायडूला काढला चिमटा; 3D ट्विट पुन्हा व्हायरल

दरम्यान, या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. पंजाब किंग्जने ११ धावांनी या सामन्यावर आपले नाव कोरले. फिनीशर म्हणून ओळख असलेला धोनीदेखील या सामन्यात आपली कमाल दाखवू शकला नाही. त्याने फक्त १२ धावा केल्या. तर पंजाबच्या शिखर धवनने ८८ धावा करत पंजाबच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Story img Loader