IPL 2024 CSK VS SRH : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामामधील १० सामन्यांमधील चेन्नई सुपर किंग्जचा हा पाचवा विजय होता. त्यामुळे चेन्नई संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. यंदा चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधापद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले असले तरी धोनीची चाहत्यांमधील क्रेझ मात्र कमी झालेली नाही. सीएसकेच्या अनेक चाहत्यांसाठी धोनी देवापेक्षा कमी नाही. त्यामुळे काही चाहते धोनीसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या समाजमाध्यमांवर धोनीच्या अशाच एका चाहत्याचा फोटो व्हायरल होत आहे. त्यात त्याने धोनीवरील प्रेमासाठी आपल्या गर्लफ्रेंडबाबत एक मोठा निर्णय घेतला; जो वाचल्यानंतर तुम्ही तर डोकेच धराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये लाइव्ह सामना पाहण्यासाठी आलेला सीएसकेचा एक चाहता हातात पोस्टर घेऊन उभा आहे. या चाहत्याने पोस्टवर लिहिले होते की, गर्लफ्रेंडच्या नावात सात अक्षरे नसल्यामुळे मी तिच्याबरोबर ब्रेकअप केले. अनेकांना आता प्रश्न पडला असेल की, सात अक्षरांचा आणि ब्रेकअप करण्याचा काय संबंध? तर संबंध आहे; कारण धोनीच्या जर्सीचा नंबर ७ आहे. त्यासह धोनीचा वाढदिवस ७ जुलैला असल्यामुळे धोनी आणि ७ नंबर यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे या चाहत्याने गर्लफ्रेंडच्या नावात सात अक्षरे नसल्यामुळे गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केले. त्याचा हा निर्णय ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

PHOTO : … म्हणून साक्षी धोनीने चेन्नईला केली होती मॅच लवकर संपवण्याची विनंती, म्हणाली, “बेबी आनेवाला है…”

धोनीच्या चाहत्याचा हा फोटो @mufaddal_vohra नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे; ज्यावर अनेकांनी धोनीचे चाहते काहीही करू शकतात, असे म्हटले आहे. तर अनेकांनी त्याने वेगळ्याच कारणासाठी ब्रेकअप केले असेल; पण सांगतोय दुसरेच, असे म्हणत त्याला ट्रोल केलेय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni fan madness break up with girl friend poster viral ipl 2024 csk vs srh match sjr