महेंद्रसिंग धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्तीबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. पण, धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. या मोसमातील चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या होम मॅचनंतर त्याने चेपॉक स्टेडियमवर ज्या प्रकारे फेरफटका मारला आणि चाहत्यांना भेटवस्तूंचे वाटप केले, त्यावरून असे दिसते की धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते. मात्र, माही अनेकदा आपल्या निर्णयांनी सर्वांना आश्चर्यचकित करतो. अशा स्थितीत त्याची ही शेवटची आयपीएल असेल, हे सांगता येत नाही.
धोनीने ज्या प्रकारे चेपॉक स्टेडियमवर चाहत्यांना भेटवस्तूंचे उदार हस्ते वाटप केले आणि त्यांचा दिवस केला. त्याचप्रमाणे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने माहीला अनोखी भेट दिली आहे. फॅनने सीएसकेच्या कर्णधाराला एम.ए. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमचे एक लघु मॉडेल भेट दिले आहे, जे अगदी स्टेडियमसारखे दिसते. फॅन्सकडून हे गिफ्ट मिळाल्यानंतर धोनीलाही आनंद झाला. स्पोर्ट्स टायगरने धोनीला उद्धृत केले होते की, “उभ्या आयुष्यात मला अशी भेट कोणीही दिली नाही.”
चेन्नई सुपर किंग्ज आणि एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी आयपीएल २०२३चा हंगाम आतापर्यंत खूप खास आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीने या मोसमात छोट्या पण जबरदस्त खेळी करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे, धोनी पुन्हा चेपॉक स्टेडियमवर परतल्याने वेगळाच उत्साह भरला आहे. चेन्नई आणि चेपॉकशी धोनीचे हे विशेष कनेक्शन त्याच्या एका चाहत्याने एक सुंदर भेट म्हणून सादर केले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता चेन्नईचा कर्णधार आणि माजी भारतीय दिग्गज एम.एस. धोनीला खास भेट देताना दिसत आहे. एका चाहत्याने एम.ए. चिदंबरम स्टेडियमची स्वतःच्या हाताने बनवलेली रचना एम.एस. धोनीला भेट दिल्याचे चित्र दिसत आहे. या फोटोला खूप पसंती दिली जात आहे.
सामन्यात काय झालं?
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन गडी गमावून २२३ धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ७९ आणि डेव्हन कॉनवेने ८७ धावा केल्या. अखेरीस शिवम दुबे २२ आणि रवींद्र जडेजाने २० धावांची जलद खेळी खेळली. दिल्लीकडून खलील अहमद, एनरिच नोर्टजे आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दिल्ली संघाला २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होणार आहे.