MS Dhoni Latest News Update : अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सचा ४९ धावांनी पराभव केला. सलग तीन विजय संपादन केल्यानंतर सीएसके गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. रहाणेनं २९ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीनं ७१ धावांची नाबाद खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी फक्त ३२ चेंडूत ८५ धावांची भागिदारी रचून चेन्नईने चार विकेट्स गमावत २३५ धावा केल्या. तसंच सलामी फलंदाज डेवॉन कॉनवेनं ५६ धावा करत अर्धशतकी खेळी केली. सुपरकिंग्जने शेवटच्या ८ षटकात १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात नाईट रायडर्सच्या संघाने जेसन रॉय २६ चेंडूत पाच षटकार आणि पाच चौकार ठोकून ६१ धावांची खेळी साकारली. तसंच रिंकू सिंगने ३३ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. तरीही केकेआर आठ विकेट्स गमावत १८८ धावांवरच पोहोचली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सामन्यातही धोनीच्या कॅप्टन्सीचा आणि रणनीतीचा अनोखा नजारा पाहायला मिळाला. २३५ धावांचा पाठलाग करण्यासाठी केकेआरचे फंलदाज मैदानात उतरल्यावर सुरुवातीलाच २ विकेट्सचा धक्का बसला होता. केकेआरसाठी जगदिशन आणि सुनील नारायण सलामीला उतरले होते. आकाश सिंगने पहिल्याच षटकात सुनीला नारायणला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेनं जगदिशनला बाद केलं.

नक्की वाचा – Video : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा धमाका! वादळी अर्धशतक ठोकल्यानं सीएसकेच्या पदरी IPL मधील सर्वाधिक धावसंख्या

परंतु, ज्याप्रकारे जगदिशनला बाद केलं गेलं, त्यामागे धोनीची रणनिती होती. जगदिशनने थर्ड मॅनच्या दिशेनं फटका मारून जडेजाच्या हातात झेल दिला, त्याचवेळी गोलंदाजाने धोनीकडे इशारा केला. तुषारने ज्या अंदाजात रिअॅक्ट केलं, ते पाहून स्पष्ट झालं की, धोनीच्या रणनितीमुळं जगदिशन बाद झाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या मुरली कार्तिकनेही धोनीच्या रणनितीकडे लक्ष वेधून प्रतिक्रिया दिली.