MS Dhoni met the family of Matheesha Pathirana: आयपीएल २०२३ मधील सामना २८ मे रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिला क्वालिफायर सामना जिंकून सीएसके संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामन्यापूर्वी सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी मथीशा पथिराणाच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीचे फोटो मथीशाची बहीण विशुकाने इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई इंडियन्स आणि श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगा याच्या सारखी मथीशा पथिराणा गोलंदाजी करतो. या २० वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये १७ बळी घेत धोनीच्या विश्वासावर खरा उतरला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना जिंकल्यानंतर धोनीने चेन्नईमध्ये पाथिरानाच्या कुटुंबाची भेट घेतली.
कर्णधार एमएस धोनीला भेटून श्रीलंकेचे कुटुंब आनंदित झाले होते. मथीशाती बहीण विशुकाने इंस्टाग्रामवर भेटीचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर ‘कॅप्टन कूल’साठी हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले. तिने लिहिले, “आता आम्हाला खात्री आहे की, मल्ली सुरक्षित हातात आहे, जेव्हा थाला म्हणाला, तुम्हाला मथीशाची काळजी करण्याची काहीच गरज नाही, तो नेहमी माझ्यासोबत असतो. हे क्षण माझ्या स्वप्नांच्या पलीकडचे होते.”
सीएसकेनी जीटीला पराभूत करत केली कमाल –
आयपीएल २०२३ मध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध १७२ धावा केल्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड (६० धावा) आणि डेव्हॉन कॉनवे (४० धावा) यांनी चमकदार कामगिरी केली. याशिवाय रवींद्र जडेजाने २२ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच सीएसके संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. वृद्धीमान साहा (१२ धावा), हार्दिक पांड्या (१२ धावा) आणि दासून शनाका (१७ धावा) यांना फार काही करता आले नाही. शुबमन गिलने ४२ आणि राशिद खानने ३० धावा केल्या. पण २० व्या षटकात शेवटच्या चेंडूवर संघ १५७ धावांवर ऑलआऊट झाला. गुजरात टायटन्सला ऑल आउट करणारा सीएसके हा आयपीएल मधील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला कोणीही ऑलआऊट करू शकले नव्हते.
अशा पद्धतीने चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तसेच दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या २६ मे रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघ २६ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे सीएसकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल २०२३ चा चॅम्पियन कोण असेल हे स्पष्ट होईल.