MS Dhoni Loses Cool Ahead of Qualifier: महेंद्रसिंग धोनी रागात दिसला, भडकला असे चित्र क्वचितच घडलेले दिसते. परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल तो नेहमी शांत राहतो. त्यामुळे त्याला कॅप्टन कूल म्हटले जाते. मात्र, यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत की, धोनीचा संयम सुटला आहे. असाच काहीसा प्रकार शनिवारी आयपीएल २०२३मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या लीग सामन्यादरम्यान पाहायला मिळाला, जेव्हा धोनी एका गोष्टीवरून अंपायरशी अडकला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता असे काय झाले की धोनी सामन्याच्या मध्यभागी अंपायरजवळ पोहोचला आणि त्याच्याशी वाद घालू लागला. चला जाणून घेऊया.

महेंद्रसिंग धोनी आणि फील्ड अंपायर याच्यात झालेल्या वादाची ही संपूर्ण घटना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १४व्या षटकानंतर घडली. यावेळी दिल्लीने सामन्यात एक विजयी होण्यासाठी चेंडूचा मुद्दा काढला आणि कॅप्टन कूल भडकला. यादरम्यान धोनी चेंडूच्या आकाराबद्दल नाराज दिसला आणि त्याने अंपायरला चेंडू बदलण्याची मागणी केली. धोनीचे म्हणणे ऐकून अंपायरने चेंडू बदलला. पण, अंपायरने धोनीकडे सोपवलेल्या दुसऱ्या चेंडूवर तो खूश नव्हता.

Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Virat Kohli net practice with Sanjay Bangar video viral ahead Ranji Trophy match
Virat Kohli Net Practice : विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये परतण्यापूर्वी गाळला घाम, नेटमध्ये सराव करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Nicholas Pooran withdraws Tom Curran run out appeal after a bizarre incident in ILT20 Video viral
Tom Curran run out : ILT20 मध्ये अजब नाट्य! रन आऊट झाल्यानंतरही टॉम करनला परत बोलावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप

हेही वाचा: IPL2023, RCB vs GT: आरसीबीच्या गोटात चिंता वाढली, पाऊस बिघडवणार का बंगळुरूचा खेळ? जाणून घ्या

चेंडू बदलाण्यावरून धोनी अंपायरवर भडकला

खरं तर, धोनीची इच्छा होती की चेंडू बदलण्याची वेळ आली आहे. असे झाले की ज्या चेंडूने सामना खेळला जात होता त्याचा आकार थोडासा बदलला होता आणि खूप जुना सुद्धा झाला होता. अशा स्थितीत धोनीने अंपायरला चेंडू बदलण्याचे आवाहन केले, जे अंपायरने मान्य केले. पण आणलेला दुसरा चेंडू जुन्या चेंडूपेक्षा अगदीच नवा होता. धोनीच्या मते काही षटके वापरलेला चेंडू आम्हाला मिळावा कारण, नवीन चेंडू त्या खेळपट्टीवर खेळणे खूप सोपे होते. त्यामुळे अंपायरच्या निर्णयावर तो भडकला आणि या लाइव्ह सामन्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यानंतर धोनी काय म्हणाला?

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून सीएसकेला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिल्यानंतर एम.एस. धोनी माध्यमांशी बोलला. तो म्हणाला, “यशाला कोणताच पर्याय नसतो. पण आपल्या संघातील खेळाडूंवर विश्वास ठेवून आणि त्यांना सर्वोत्तम प्रदर्शनासाठी आत्मविश्वास देऊन हे साध्य करता येऊ शकते.” धोनीने आपल्या १४ आयपीएल हंगामांमध्ये १२व्या वेळी प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. आपल्या संघाला प्लेऑफमध्ये सातत्याने पोहोचवण्याविषयी देखील धोनीला प्रश्न विचारला गेला.

हेही वाचा: Rinku Singh: … स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे! रिंकूची एक चूक अन् कोलकात्याने हातातोंडाशी आलेला घास गमावला

या प्रश्नावर थालाने उत्तर दिले की, “अशी कोणतीच पद्धत ठरलेली नाही. संघासाठी जे योग्य ते आम्ही सर्वोत्तम खेळाडू निवडतो आणि त्यांना खेळवतो. खेळाडू ज्याठिकाणी कमी पडतात, त्याठिकाणी त्यांच्याकडून सराव करून घेतो. संघ व्यवस्थापनालाही याचे श्रेय दिले पाहिजे. पण सर्वात महत्वाची भूमिका खेळाडूंचीच असते. खेळाडू नसतील, तर आम्हीही काहीच करू शकणार नाही. आम्ही खेळाडूंच्या वैयक्तिक प्रदर्शनावर लक्ष देत नाही, आम्ही फक्त संघाच्या प्रदर्शनावर लक्ष देत आहोत.”

Story img Loader