आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला गेला. ही लढत चांगलीच रंगतदार ठरली. हा सामना ५४ धावांनी गमावल्यानंतर चेन्नई संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, चेन्नईने सामना गमावला असला तरी माजी कर्णधार आणि चेन्नईचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात नवा विक्रम रचलाय. या सामन्यात पंजाबचा विजय झालेला असला तरी पराभूत झालेल्या संघातील धोनीचीच सगळीकडे चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद

धोनीने कोणता नवा विक्रम रचला ?

महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत एकदीवसीय, टी-२० तसेच अनेक कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्याकडे कर्णधारपदाचाही मोठा अनुभव आहे. दरम्यान, तो भारतीय संघाकडून सर्वात जास्त टी-२० सामने खेळणारा क्रमांक दोनचा फलंदाज ठरला आहे. धोनीचा पंजाबविरुद्धचा ३५० वा टी-२० सामना होता. रोहित शर्माने भारताकडून आतापर्यंत सर्वाधक म्हणजेच ३७२ सामने खेळलेले असून तो या विक्रमामध्ये प्रथमस्थानी आहे. या विक्रमामध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेला सुरेश रैना तिसऱ्या क्रमांवर आहे. रैनाने भारताकडून आतापर्यंत ३३६ टी-२० सामने खेळलेले आहेत. धोनीने खेळलेल्या ३५० सामन्यांमध्ये २२३ सामने आयपीएलचे आहेत. तर ९८ आंतरराष्ट्रीय सामने आहेत.

हेही वाचा >> IPL 2022: चेन्नईने सलग तीन गमावल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, नेटकरी म्हणाले “सुरेश रैना…”

दरम्यान, काल झालेल्या पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा ५४ धावांनी पराभव झाला. चेन्नईचा एकही फलंदाज चांगली फलंदाजी करु शकला नाही.