MS Dhoni praises Virat Kohli: गेल्या काही वर्षांमध्ये, फलंदाजीतील हीरो विराट कोहली भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीबद्दल कौतुक करण्यापासून कधीही मागे हटला नाही. टीम इंडियाचे धडाडीचे खेळाडू माजी भारतीय कर्णधार कोहली आणि धोनी यांनी त्यांच्या अविश्वसनीय क्रिकेट कारकिर्दीतून अतूट मैत्री निर्माण केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार कोहली हा भारतीय क्रिकेटचा चेहरा आहे, तर धोनी हा चार वेळा इंडियन प्रीमियर लीग विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचे धडधडणारे हृदय आहे.
चेन्नईच्या चाहत्यांनी त्याला ‘थाला’ टोपणनाव दिले आहे. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्ये सहभागी झाला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध कर्णधार धोनीने अलीकडेच सुपर किंग्जच्या ड्रेसिंगमध्ये एक उत्साही भाषण देताना कोहलीचा विशेष उल्लेख केला. आयपीएल २०२३ दरम्यान, माजी चॅम्पियन सीएसकेने शनिवारी आयपीएल २०२३च्या दुसऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला तेव्हा धोनीच्या सीएसकेने चेपॉक येथे आयपीएल २०२३मध्ये मुंबई इंडियन्सला हरवले. सामन्यानंतर ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, कर्णधार धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या शिबिरात त्याच्या एका प्रेरणादायी भाषणात कोहलीचा विशेष उल्लेख करताना दिसतो.
कोहलीच्या फलंदाजीच्या शैलीबद्दल बोलताना धोनी म्हणतो, “ विराट कोहली त्याच्या पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ खेळत नाही तो योग्य संधीची वाट बघतो.” या दुर्मिळ व्हिडिओने सोशल मीडियावर नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने देखील चालू हंगामातील आयपीएल व्हायरल व्हिडिओवर एक उल्लेखनीय टिप्पणी दिली आहे. धोनीच्या सीएसकेने शनिवारी एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२३च्या ४९व्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखून पराभव केला. मुंबईविरुद्ध तीन विकेट्स आणि १५ धावा काढणार्या मथीशा पाथिरानाला त्याच्या गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
आयपीएलच्या या सामन्यात सीएसकेने एमआयवर मिळवलेल्या विजयाबद्दल बोलताना, धोनीने त्याचा सहकारी पाथिरानाचे कौतुक केले. सीएसकेच्या कर्णधाराने पाथिरानाला कसोटी क्रिकेटच्या एवढ्या लवकर खेळू नकोस असे म्हणत त्याला आवाहन केले. धोनी म्हणाला, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की तो कोणीतरी वेगळा खेळाडू असून सध्या त्याने कसोटी क्रिकेट पासून दूर राहावे आणि नंतर त्यात स्वतःला आजमावावे.” धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नईने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवून आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.