CSK vs MI IPL 2025 MS Dhoni Stumping Video: मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामना चेपॉकच्या मैदानावर खेळवला गेला. चेन्नईने चेपॉकचा किल्ला अभेद्य राखत मुंबईवर विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने विघ्नेश पुथूरे आपल्या गोलंदाजीमुळे सर्वांचं लक्ष वेधलं. पण त्याआधी धोनीची जबरदस्त स्टम्पिंग पाहायला मिळाली. ज्याचा व्हीडिओ अजूनही व्हायरल होत आहे.

पहिल्याच सामन्यात धोनीने विजेच्या वेगाने स्टम्पिंग करत सर्वांनाच चकित केले. त्याचं स्टम्पिंग एवढं वेगवान होतं की मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याचा अंदाजही आला नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोनीने अवघ्या ०.१२ सेकंदात बेल्स विखुरल्या. यामुळेच सूर्यकुमार यादवही काही समजण्याआतच बाद झाला होता. तोही धोनीचा वेग पाहून थक्क झाला. ४३ वर्षीय धोनीने आपल्या जुन्या अंदाजात केलेली स्टम्पिंग पाहून त्याच्या फिटनेसचा प्रत्यत येत आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ सततच्या विकेटने धावफलकावर चांगली धावसंख्या उभारण्याच्या मागे होता. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चांगली भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण ११व्या षटकात नूर अहमदच्या चलाखीपुढे आणि धोनीच्या चपळाईपुढे तो फार काळ मैदानावर टिकू शकला नाही.

नूर अहमदविरुद्धच्या षटकातल तिसऱ्या चेंडूवर त्याने क्रीजवरून पुढे येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमारने त्याची बॅट स्विंगही नीट पूर्ण करू शकला नाही आणि फटका खेळण्यासाठी आणि चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातात गेला. धोनीने क्षणाचाही विलंब न लावता बेल्स विखुरल्या आणि तोपर्यंत सूर्यकुमार पुन्हा क्रिझमध्ये पोहोचला शकला नव्हता.

धोनीने क्षणार्धात बेल्स विखुरल्यामुळे कोणालाही अंदाज आला नाही की सूर्यकुमार यादव स्टम्पिंग झाला. पण तितक्यात पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आला. रिव्ह्यू घेण्याआधीच सूर्यकुमारही पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसत होतं की सूर्या पुढे जाऊन चेंडू खेळायला गेला आणि तो क्रीझमध्ये परतण्यापूर्वी धोनीने बेल्स विखुरल्या होत्या. धोनीच्या या स्टम्पिंगचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. चेन्नईला सामन्यात आपला दबदबा कायम राखण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची भागीदारी तोडणं महत्त्वाचं होतं. जे काम नूर अहमदच्या गोलंदाजीवर धोनीने चपळाईने पूर्ण केलं.

चेपॉकच्या मैदानावर नेहमीप्रमाणे सीएसकेने आपला दबदबा कायम राखला. पहिल्या डावात मुंबईचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर मुंबईची फलंदाजी बाजू सीएसकेच्या फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकली आणि २० षटकांत संघाला केवळ १५५ धावा करता आल्या.

विशेषत: नूर अहमदची फिरकी चेन्नईसाठी प्रभावी ठरली. त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा दिल्या आणि ४ महत्त्वाचे विकेट घेतले. सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय त्याने तिलक वर्मा, रॉबिन मिंज आणि नमन धीर यांची विकेट घेतली. त्याच्याशिवाय खलील अहमदने ३ विकेट घेतले. आर अश्विन आणि नॅथन एलिस यांनाही १-१ विकेट मिळाले.