MS Dhoni register embarrassing record as captain: आयपीएल २०२३ मधील ४१ वा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात पंजाबने चेन्नईचा ४ विकेट्स राखून पराभव केला. या पराभवानंतर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला एमएस धोनी आयपीएल इतिहासातील सर्वात खराब कर्णधार ठरला आहे. धोनीचा संघ सीएसकेला रविवारी त्यांच्याच घरच्या मैदानावर २०० धावा करूनही पंजाब किंग्जकडून पराभव पत्कारावा लागला.

आयपीएल १६व्या हंगामातील ४१ व्या सामन्यात पंजाब किंग्सने असे काही केले, जे आयपीएलच्या इतिहासात इतर कोणताही संघ करू शकला नाही. डेव्हॉन कॉनवेच्या शानदार नाबाद ९२ धावांच्या जोरावर चार वेळच्या चॅम्पियन चेन्नईने प्रथम फलंदाजी २०० धावा केल्या. पण पंजाबने चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना चार गडी राखून जिंकला. त्याचबरोबर चेपॉक मैदानावर सर्वाधिक यशस्वी पाठलाग करण्याची नोंद केली.

Pratham Singh Scores Maiden Duleep Trophy Century for India A vs India D Match
Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या जागी आलेल्या ३२ वर्षीय बदली खेळाडूने झळकावले दुलीप ट्रॉफीतील पहिले शतक, जाणून घ्या कोण आहे?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
India Creates History with Best Ever 20 Medal Haul At Paris Paralympics For The First Time
Paris Paralympics 2024: भारताची पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी, अवघ्या सहा दिवसांत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा केला विक्रम
Royal Enfield Classic 350 vs Jawa 350 Bringing retro back
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५०; कोणती सर्वात जबरदस्त?
Preethi Pal Becomes First Indian Woman Athlete who won 2 Medals in Paralympics
Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने सलग दुसरे पदक जिंकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू
Ayush badoni played biggest innings of t20 history in DPL 2024
DPL 2024 : आयुष बदोनीने खेळली भारतीय T20 इतिहासातील सर्वात मोठी खेळी, मोडला श्रेयस अय्यरचा विक्रम
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
Ayush Shukla becomes third player to bowl four maidens
Ayush Shukla : भारतीय वंशाचा आयुष शुक्ला हाँगकाँगसाठी चमकला, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला मोठा पराक्रम

एमएस धोनी ठरला आयपीएलमधील सर्वात खराब कर्णधार –

कर्णधार म्हणून धोनीचा हा तिसरा पराभव आहे, जेव्हा तो २०० हून अधिक धावांचा बचाव करत होता. मात्र यावेळी त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे धोनी आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब कर्णधार बनला आहे. या नको असलेल्या यादीत धोनीने आता विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा – IPL 2023 MI vs RR: १९ मीटर मागे धावत जाऊन संदीप शर्माने घेतला सूर्याचा अप्रतिम झेल; पाहा VIDEO

आयपीएलमध्ये २०० हून अधिक धावांचा बचाव करताना सर्वाधिक सामने गमावणारे कर्णधार –

३ वेळा – एमएस धोनी
२ वेळा – विराट कोहली
२ वेळा – फाफ डु प्लेसिस

सामन्याबद्दल बोलायचे तर, एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना २००/४ अशी धावसंख्या उभारली, जी बचावासाठी पुरेशी वाटत होती. परंतु सीएसकेच्या गोलंदाजांना आपल्या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी आले. कारण पंजाब किंग्ज संघाने प्रत्युत्तरात ६ बाद २०१ धावा केल्या.

हेही वाचा – RR vs MI: शतकवीर यशस्वी जैस्वालला रोहित शर्माने विचारला मजेशीर प्रश्न; म्हणाला, “एवढी ताकद…”

आयपीएलच्या १६ व्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्जचा नऊ सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. या संघाने आतापर्यंत केवळ पाच सामने जिंकले आहेत. तसेच पंजाब किंग्जचा नऊ सामन्यांमधील हा पाचवा विजय आहे.