Rajasthan Royals vs Chennai Super Kings IPL Match Updates : आयपीएल २०२३ च्या १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव केला. सीएसकेला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने सटीक यॉर्कर फेकत चेन्नईला पराभवाच्या छायेत नेलं. धोनी षटकार ठोकून सामना जिंकून देईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पंरतु, गोलंदाजाने कमाल केली आणि राजस्थान रॉयल्सला शानदार विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर धोनीने पराभवाची कारणे सांगितली आणि संदीप शर्माचं कौतुक केलं.

सामना संपल्यानंतर धोनीने माध्यमांशी बोलताना म्हटलं, “मधल्या इनिंगच्या षटकांमध्ये आम्हाला जास्त स्ट्राईक रोटेशन करण्याची आवश्यकता होती. फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल नव्हती, पण विरोधी संघाकडे अनुभवी गोलंदाज होते आणि आम्ही स्ट्राईक रोटेट करू शकलो नाही. हे खूप कठीण नव्हतं आणि फलंदाजांना या आव्हानाचा सामना करायला हवा होता. आम्ही धावांचे लक्ष्य गाठण्याच्या जवळ गेलो होते, हे खूप चांगलं होतं. टूर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात याचा परिणाम आमच्या रनरेटवर प्रभावित करू शकतो.”

Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

नक्की वाचा – …म्हणून सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात, RCB चा पराभव होताच ‘ते’ ट्वीट झालं व्हायरल

….म्हणून धावांचं लक्ष्य गाठू शकलो नाही – धोनी

धोनीने म्हटलं की, “जर गोलंदाज अचूक लाईनवर गोलंदाजी करत असेल, तर फलंदाजांसाठी कठीण परिस्थिती होते. मी नेहमी गोलंदाजांच्या चुकीची वाट पाहत असतो. अशा दबावाच्या परिस्थितीत गोलंदाज काहीतरी चूक करेल, अशी अपेक्षा असते. जर गोलंदाज या दबावाला सामोरं जावून योग्य गोलंदाजी करत असेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही फलंदाजीच्या बाबतीत शेवटची जोडी होतो. आम्ही मधल्या फळीतील षटकांमध्ये धावांचा वेग वाढवण्यात उशीर केला. आम्ही अजून सिंगल धावा घेऊ शकलो असतो आणि आम्ही सुरुवातीलाच धडाकेबाज फलंदाज करु शकलो नसतो.”