MS Dhoni Acknowledges Fans Chanting For Him At Ekana Stadium : महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट विश्वातील फार मोठे यशस्वी नाव आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. सध्या ज्या शहरांत आयपीएलचे सामने रंगतात, त्या शहरांत धोनीच्या नावाचा एकच जयघोष केला जात आहे. त्यातून चाहत्यांमध्ये धोनी ऊर्फ थालाविषयी असलेली क्रेझ कायम दिसून येते. १९ एप्रिलच्या रात्री आयपीएलचा ३४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लखनौमधील इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. तसे बोलायचे म्हटले, तर लखनौ सुपर जायंट्सचं ते होम ग्राउंड होतं; पण चर्चा फक्त माहीच्याच होत होत्या. चाहते ‘धोनी धोनी’च्या घोषणा देत होते. आता त्या सामन्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये धोनीने भरमैदानात केलेली एक कृती चाहत्यांना चांगलीच भावली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा