MS Dhoni Thanks To His Fans In Narendra Modi Stadium Video Viral : संपूर्ण क्रिडाविश्वात नंबर वन कर्णधार म्हणून ठसा उमटवलेल्या एम एस धोनीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण चेन्नई सुपर किंग्जला समर्थन देणाऱ्या चाहत्यांचा नादच खुळा आहे. देशभरात ज्या ठिकाणी सामना असेल त्या मैदानात धोनी पोहोचण्याच्या आधी पिवळ्या जर्सीतील धोनीचे हे चाहते आधीच पोहोचलेले असतात. धोनी मैदानात फलंदाजीला उतरला की आख्ख्या स्टेडियममध्ये चाहते मोबाईची टॉर्च चालू करून धोनीला चिअर अप करतात. धोनी धोनीच्या घोषणा देऊन या चाहत्यांनी आयपीएलचा संपूर्ण हंगामच एकप्रकारे धोनीचा असल्याचं चित्र निर्माण केलं.

धोनीला मिळालेला चाहत्यांचा आशिर्वाद मोलाचा असल्याचं धोनी नेहमीच सांगत असतो. सोमवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर जेतेपदाचे नाव कोरले. रविवारी पावसामुळं सामना रद्द झाला, पण धोनीच्या चाहत्यांनी घरचा रस्ता गाठला नाही. काही चाहत्यांनी तर थेट स्टेशनवरच झोपून रात्र काढली. अशा या जबरा फॅन्सला सामना संपल्यानंतर धोनीनं मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानून रिटर्न गिफ्ट दिलं आहे. धोनी आणि त्याच्या चाहत्यांमध्ये असलेलं हे बॉण्डिंग कॅमेरात कैद झालं असून धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
oath ceremony of Mahavikas Aghadi MLAs in the assembly session print politics news
महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Sambhaji Chhatrapati Devendra Fadnavis Oath Ceremony Advertisement
Sambhaji Chhatrapati : “हे खपवून घेणार नाही”, भाजपाची शपथविधीची जाहिरात पाहून संभाजी छत्रपतींचा संताप, नेमकं प्रकरण काय?
Harbhajan Singh has said that he does not talk to MS Dhoni
Harbhajan Singh : ‘मी १० वर्षांपासून धोनीशी बोलत नाही…’, हरभजन सिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी सीएसकेत असताना…’
MS Dhoni And Sakshi Join Folk Dancers In Rishikesh; Groove To 'Gulabi Sharara' video viral
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह ऋषिकेशमध्ये पहाडी गाण्यासह ‘गुलाबी शरारा’वर धरला ठेका, पाहा VIDEO
Eknath Shinde
Deepak Kesarkar : शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीला वेग; भाजपाकडून पाहणी, शिवसेनेत नाराजी? नेते म्हणाले, “मोठा भाऊ…”

नक्की वाचा – चेन्नईने IPL चा किताब जिंकल्यानंतर धोनीच्या कुटुंबियांचे आनंदाश्रू तरळले, पत्नी साक्षी अन् मुलगी झिवा झाली भावुक, ‘तो’ Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

शेवटच्या दोन चेंडूवर चेन्नईला १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने चौकार-षटकार ठोकला आणि चेन्नईनं आयपीएलचा पाचवा किताब जिंकला. धोनी शून्यावर बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये गेला आणि शांत बसला. तो कमालीचा भावुक झाला होता. पण जडेजानं चेन्नईला विजय मिळवून दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जडेजाला त्याने मिठी मारून आनंद साजरा केला. तसंच धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा मैदानात भावुक झाली आणि जीवाने धोनीला मिठी मारुन आनंद साजरा केला. धोनीच्या कुटुंबियांचा मैदानातील तो भावुक क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Story img Loader