Dhoni revealed about Ajinkya’s innings: आयपीएल २०२३ चा १२ वा सामना शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला तो खूपच वेगळा होता. या सामन्यात चेन्नईने मुंबईवर सात गडी राखून विजय मिळवला.चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमआयची सुरुवात चांगली झाली, पॉवरप्लेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी पाहून धावसंख्या २०० पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. परंतु १० षटकात सीएसकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना एमआयच्या फलंदाजीची कंबर मोडली. यानंतर कर्णधार धोनीने अजिंक्य आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली.
अजिंक्यच्या खेळीबाबत धोनीने केला खुलासा –
प्रथम फलंदाजी करताना एमआयला २० षटकात ८ गडी गमावून १५७ धावाच करता आल्या. यानंतर सीएसके संघातून पदार्पण करणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेने बॅटने असा धुमाकूळ घातला घडवला की जग थक्क झाले. रहाणेने येताच वेगवान फलंदाजी केली आणि फक्त १९ चेंडूत आयपीएल २०२३ मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने २७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने २२५.९३ च्या स्ट्राइक रेटने एकूण ६१ धावा केल्या. रहाणेचे हे रूप आजच्या आधी क्वचितच कोणी पाहिले असेल. अखेर, त्याने इतकी स्फोटक फलंदाजी कशी केली, याचा खुलासा एमएस धोनीने सामन्यानंतर केला.
हेही वाचा – Ajinkya Rahane: सीएसकेला विजय मिळवून दिल्यानंतर अजिंक्यने व्यक्त केली मनातील भावना; म्हणाला, मला…
ताण घेऊ नको, आम्ही तुला पाठीशी घालू –
धोनी म्हणाला, “सीझनच्या सुरुवातीला मी आणि जिंक्स (अजिंक्य रहाणे) बोललो होतो. मी त्याला त्याच्या ताकदीनुसार खेळायला सांगितले. मैदानात खळबळ माजवण्यासाठी तुझए कौशल्य वापर. मी त्याला सांगितले की जा आणि खेळाचा पुरेपूर आनंद घ्या. तू टेन्शन घेऊ नको, आम्ही तुला पाठीशी घालू. त्याने चांगली फलंदाजी केली आणि तो ज्या प्रकारे बाद झाला त्यावर तो खूश नव्हता.”
धोनीकडून गोलंदाजांचे कौतुक –
धोनी दीपक चहरबद्दल म्हणाला, “हे विसरता कामा नये की आम्ही पहिल्याच षटकात दीपकला गमावले. चांगली गोष्ट म्हणजे फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. सात षटकानंतर तो थोडासा वळू लागला. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. मंगला आणि प्रिटोरियस यांनी शानदार गोलंदाजी केली.”
तुषार देशपांडेचे कौतुक करताना धोनी म्हणाला, “आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुमच्यावर दबाव असतो, पण काही वर्षे आयपीएलमध्ये खेळल्याने वेगळ्या प्रकारचे दडपण येते. त्याचा देशांतर्गत हंगाम चांगला होता, तो सुधारत आहे.” पॉइंट टेबलच्या प्रश्नावर धोनी म्हणाला, “मला प्रत्येक सामना महत्त्वाचा वाटतो, तुम्ही तुमच्यासमोर असलेल्या समस्यांकडे लक्ष द्या आणि एका वेळी एक पाऊल टाका. तूर्तास पॉइंट टेबलकडे पाहू नका