IPL 2023 CSK vs LSG Match: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. दरम्यान या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे. त्याचबरोबर संघाचा कर्णधार एमएस धोनीकडे एक मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी असेल.

धोनीला या खास क्लबमध्ये सहभागी होण्याची संधी –

आयपीएलमध्ये आतापर्यंत धोनीने ३९.१९च्या सरासरीने ४९७८ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८४ आहे आणि त्याने २३ अर्धशतके केली आहेत. धोनीने या कालावधीत १३५.१९च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. तो ८ धावा करताच आयपीएलमध्ये ५,००० धावा पूर्ण करेल. ही कामगिरी करणारा तो केवळ सहावा खेळाडू असेल. त्याच्याआधी विराट कोहली, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स यांनी पाच हजार धावा केल्या आहेत.

India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Deoli Vidhan Sabha Election Ranjeet Kamble vs Rajesh Bakane
Deoli Vidhan Sabha Constituency : भाजपचा निर्धार, यावेळी तरी देवळीत यशस्वी ठरणार का…
Arjuni Morgaon Vidhan Sabha Election Rajkumar Badole vs Sugat Chandrikapure vs Dilip Bansod
Arjuni Morgaon Vidhan Sabha Constituency : अर्जुनी मोरगावात बहुरंगी लढत; महायुतीपुढे बंडखोरांचे, तर आघाडीपुढे नाराजांचे आव्हान
Twenty20 series India vs South Africa match sport news
भारताच्या युवा ताऱ्यांचा कस; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना आज
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव

हेही वाचा – VIDEO : सुनील ग्रोव्हरने शिखर धवनकडे केली खास मागणी; व्हिडीओ पाहून चाहत्यांना हसू अनावर

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१. विराट कोहली – ६७०६
२. शिखर धवन – ६२८४
३. डेव्हिड वॉर्नर – ५९३७
४. रोहित शर्मा – ५८८०
५. सुरेश रैना – ५५२८

चेन्नईला आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीची आशा आहे –

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये चेन्नईची निराशाजनक कामगिरी झाली होती. संघ १० व्या स्थानावर राहिला. यानंतर यंदाच्या लिलावात संघाने बेन स्टोक्ससारख्या तेजस्वी अष्टपैलू खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडूनही चेन्नईला विशेष कामगिरीची अपेक्षा असेल. हे त्याचे शेवटचे आयपीएल देखील असू शकते.

गेल्या मोसमात दोन्ही संघ एकमेकांशी भिडले होते, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात लखनऊने सीएसकेविरुद्ध २११ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने रॉबिन उथप्पाच्या ५० आणि शिवम दुबेच्या ४९ धावांच्या जोरावर ७ गडी गमावून २१० धावा केल्या होत्या. लखनऊतर्फे आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.

आयपीएल २०२३ साठी सीएसके संघ:

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, सिमरजित सिंह, दीपिका, दीपिका, प्रशांत सोळंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा.