Dhoni’s Review System: आयपीएलच्या २०२३ च्या ३३व्या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाला २० षटकांत ८ गडी गमावून १८६ धावा करता आल्या. त्यामुळे सीएसकेने ४९ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात चेन्नईच्या डावात धोनीच्या रिव्ह्यू सिस्टीमचा पुन्हा एकदा बोलबाला पाहिला मिळाला.
केकेआरविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेला २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या रूपाने चौथा धक्का बसला. यानंतर फलंदाजीला आलेल्या एमएस धोनीला केकेआरचा गोलंदाज कुलवंत खेजुरलियाने एक चेंडू टाकला. जो कंबरेच्या वर होता, पण अंपायरने तो नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी धोनीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर, जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले, तेव्हा स्पष्टपणे चेंडू धोनीच्या कमरेच्या वर जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.
चेन्नईने कोलकात्यावर मात केली –
चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ४९धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २९ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय शिवम दुबेने २१ चेंडूत ५० धावा आणि डेव्हन कॉनवेने ४० चेंडूत ५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाला २० षटकांत ८ गडी गमावून १८६ धावा करता आल्या. जेसन रॉयने २६ चेंडूत सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याचवेळी रिंकू सिंगने ३३ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली.
हेही वाचा – RCB vs RR: सामन्यादरम्यान विराट कोहली झाला रोमँटिक, अनुष्का शर्माला दिला फ्लाइंग किस, VIDEO व्हायरल
या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचे सात सामन्यांतून पाच विजय आणि दोन पराभवांसह १० गुण आहेत. त्याचबरोबर कोलकाता संघाचे सात सामन्यांत दोन विजय आणि पाच पराभवांसह चार गुण आहेत. गुणतालिकेत संघ आठव्या स्थानावर आहे.
रहाणेने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले –
या मोसमात सीएसके संघाकडून खेळताना दिसणारा अजिंक्य रहाणेने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. केकेआरविरुद्धच्या या सामन्यातही त्याने केवळ २९ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट २४४.८३ होता. रहाणे आतापर्यंत त्याच्या १५३ आयपीएल डावांमध्ये २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह फक्त दोनदा दिसला आहे. हे दोन्ही डाव त्याने यया मोसमात खेळले आहेत.