RCB vs MI, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात रंगतदार सामना झाला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. सुरुवातीच्या षटकांमध्ये मुंबईची फलंदाजी गडगडली आणि तिलक वर्माने सावध खेळी करत वादळी अर्धशतक ठोकलं. मुंबईचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाल्यानंतप तिलकने मात्र चौफेर फटकेबाजी करत ४६ चंडूत नाबाद ८४ धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या इनिंगमध्ये त्याने ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले. मुंबई इंडियन्ससाठी एकट्या तिलकने मैदानात धावांचा पाऊस पाडत आपल्या संघाची शान राखली. विशेष म्हणजे २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट मारून तिलकने षटकार ठोकला. तिलकचा हा अंदाज पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर तिलकच्या फलंदाजीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – IPL 2023, Virat Kohli: चिन्नास्वामी मैदानात रचला इतिहास; कोहलीच्या नावावर ‘या’ विराट विक्रमाची नोंद

इथे पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या अर्धा डझन फलंदाजांना आरसीबीच्या गोलंदाजांनी पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर तिलकने मात्र धावांचा आलेख चढताच ठेवला. दुसऱ्या एंडकडून कोणत्याच फलंदाजाची साथ मिळत नसतानाही तिलकने चौफेर फटकेबाजी केली. तिलकने मुंबईच्या पहिल्याच सामन्यात आक्रमक फलंदाजीचा धमाका केल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी आणि कर्णधार रोहित शर्मानेही तिलकवर स्तुतीसुमने उधळली.

तिलक वर्माने मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एम एस धोनीनंतर तिलक वर्माच्या रुपात हेलिकॉप्टर शॉट मारणारा डावखुरा फलंदाज मिळाला, असा सूर चाहत्यांनी सोशल मीडियावर धरला आहे. ट्वीटर हॅंडलवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी तिकलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिलकला टीम इंडियात घ्या, असा मागणी नेटकरी इंटरनेटच्या माध्यमातून करताना दिसत आहेत.