IPL 2024 Mumbai Indians Viral Video : मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे; जो दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ सध्याच्या सीझनमध्ये फक्त तीन सामने जिंकू शकला. त्यामुळे आता पुढील सर्व सामने जिंकले, तरच मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये एन्ट्री करू शकेल; अन्यथा संघावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स संघ सराव सत्रात जोरदार तयारी करीत आहे. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला; ज्यात मुंबईचे फलंदाज दमदार शॉट्स खेळताना दिसतायत. पण, त्यांच्या याच शॉट्समुळे मुंबई इंडियन्सचे ४० हजारांचे नुकसान झालेय. ते कसे काय ते जाणून घेऊ…

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडीओत मुंबई इंडियन्सचे फलंदाज टीम डेव्हिड आणि सूर्यकुमार यादव फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या शॉट्समुळे काही कॅमेरे तुटले. त्यामुळे फ्रँचायजीचे बरेच नुकसान झाले. फलंदाजांचे काही उत्कृष्ट शॉट्स व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड करता यावेत यासाठी कॅमेरे जवळ ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांच्या शॉट्समुळे ते कॅमेरेच तुटले. त्यामुळे फ्रँचायजीचे जवळपास ४० हजारांचे नुकसान झाले आहे.

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

व्हिडीओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्हाला ही रील बनविण्यासाठी ४० हजार रुपये लागले. दरम्यान, या व्हिडीओवर युजर्सदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

PBKS VS KKR : पंजाब किंग्जला मोठा झटका, ‘या’ खेळाडूने सोडली संघाची साथ; म्हणाला, “इन्शाअल्लाह लवकरच….”

मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२४ मधील कामगिरीवर बोलायचे झाल्यास, हा संघ आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांपैकी केवळ तीन सामने जिंकू शकलाय. त्यामुळे स्कोअरबोर्डवर तो आता आठव्या स्थानी आहे. त्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स नऊपैकी चार सामने जिंकून सहाव्या स्थानी आहे.

जर मुंबई इंडियन्सला हरविण्यात यश मिळाले, तर दिल्लीचा संघ सर्वोत्तम चार संघांमध्ये स्थान मिळवू शकेल. कर्णधार ऋषभ पंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, संघाने अनेक सामने गमावले असले तरी संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.