सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच मातील धूळ चारच मुंबई इंडियन्सने दिमाखात ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला आहे.  मुंबईने मिचेल मॅक्लेघनने तीन विकेट्स मिळवत हैदराबादचे कंबरडे मोडले आउि मुंबईने त्यांचा ११३ धावांमध्येच खुर्दा उडवला. हे आव्हान फक्त एक फलंदाज गमावत मुंबईने लीलया पेलले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत आठ विजयांसह ‘क्लालिफायर-१’मध्ये प्रवेश केला असून त्यांना चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांचा धुव्वा उडवला. त्यांचे दोन्ही फलंदाज अवघ्या सात धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतरही ठराविक फरकाने मुंबईने त्यांना धक्के दिले आणि १३३ धावांमध्ये त्यांचा डाव आटोपला. मुंबईकडून मॅक्लेघनने भेदक मारा करत फक्त १६ धावांमध्ये तीन बळी मिळवले, तर लसिथ मलिंगा आणि जगदीश सुचित यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याला सुरेख साथ दिली.
हैदराबादच्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना पार्थिव पटेल आणि लेंडस सिमन्स यांनी १०६ धावांची सलामी देत मुंबईचा विजय सुकर केला. पटेलने ३७ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर नाबाद ५१ धावांची खेळी साकारली, तर सिमन्सने ४ चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ४८ धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत सर्व बाद ११३ (के. एल. राहुल २५; मिचेल मॅक्लेघन ३/१६, जगदीश सुचित २/१४) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १३.५ षटकांत १ बाद ११४ (पार्थिव पटेल नाबाद ५१, लेंडल सिमन्स ४८; कर्ण शर्मा १/३८).
सामनावीर : मिचेल मॅक्लेघन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलचे ‘प्ले-ऑफ’मधील सामने
दिनांक    प्ले-ऑफमधील सामने    स्थळ    वेळ    
१९ मे    ़मुंबई वि. चेन्नई (क्वालिफायर-१)    मुंबई    रा. ८ वा.
२० मे    राजस्थान वि. बंगळुरु (एलिमिनेटर)    पुणे    रा. ८ वा.
२१ मे    क्वालिफायर-२    रांची    रा. ८ वा.
२४ मे    अंतिम फेरी कोलकाता    रा. ८ वा.

मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians beat sunrisers hyderabad to seal playoff spot