Mumbai Indians Record in IPL MI vs KKR: मुंबई इंडियन्सने अखेरीस आयपीएल २०२५ मध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने वानखेडेच्या मैदानावरील सामन्यात केकेआरचा ८ विकेट्स आणि ४३ चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. मुंबईच्या संघाने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सुरूवातीला केकेआरला ११६ धावांवर सर्वबाद केले. तर नंतर प्रत्युत्तरात १२.५ षटकांत ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
केकेआरविरुद्ध विजय नोंदवून मुंबई संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये एकाच मैदानावर विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवणारा संघ बनला आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध एकूण १० सामने जिंकले आहेत. यासह मुंबईने केकेआरचा विक्रम मागे टाकला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर आयपीएलमध्ये केकेआर संघाने पंजाब किंग्जविरुद्ध ९ सामने जिंकले आहेत.
मुंबई इंडियन्स संघाचं घरचं मैदान हे वानखेडे स्टेडियम आहे. मुंबई इंडियन्स या मैदानावर आयपीएलमधील आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर एकूण ५३ सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स आहे, ज्यांनी ५२ सामने ईडन गार्डन्सच्या मैदानावर जिंकले. तर चेन्नई सुपर किंग्सने ५१ सामने चेपॉकच्या मैदानावर जिंकले आहेत.
आयपीएलमधील एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकलेले संघ
५३ विजय – मुंबई इंडियन्स (वानखेडे)*
५२ विजय – कोलकाता नाईट रायडर्स (ईडन गार्डन्स)
५१ विजय – चेन्नई सुपर किंग्स (एम. ए. चिदंबरम)
४४ विजय – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (एम. चिन्नास्वामी, बंगळुरू)
३७ विजय- राजस्थान रॉयल्स (सवाई मानसिंग, जयपूर)
३७ विजय – सनरायझर्स हैदराबाद (राजीव गांधी)
३७ विजय – दिल्ली कॅपिटल्स (अरुण जेटली दिल्ली)
३१ विजय – पंजाब किंग्स (आय एस बिंद्रा पंजाब)
आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय
२४ – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स*
२१ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२१ – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स
२० – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२० – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आयपीएलमध्ये एका ठिकाणी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय
१० – वानखेडे स्टेडियम, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स*
९ – ईडन गार्डन्स, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स
८ – वानखेडे स्टेडियम, मुंबई इंडियन्स विरुद्ध वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
८ – चिन्नास्वामी स्टेडियम, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू