IPL Auction 2025 Trent Boult Mumbai Indians: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२५ च्या लिलावात पहिलाच खेळाडू खरेदी करत संघ अधिक मजबूत केला आहे. मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर बोली लावत त्याला १२.०५ कोटींना संघात सामील केलं आहे. मुंबई इंडियन्सने याआधीच अनुभवी फलंदाजांना संघात कायम ठेवलं आहे. आता बुमराहच्या जोडीला बोल्टला मुंबईने संघात सामील केलं आहे. बोल्ट गेली तीन वर्षे राजस्थान रॉयल्सचा भाग होता. आता बोल्टची पुन्हा घरवापसी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सकडे संघ तयार करण्यासाठी ४५ कोटी रुपये आहेत. त्यामुळे संघ बांधणीसाठी मिळालेल्या १२० कोटींपैकी मुंबई इंडियन्सने ७५ कोटी रुपये हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना रिटेन करण्यात खर्च केला. मुंबईला एकूण २० खेळाडू खरेदी करायचे आहेत, ज्यामध्ये ८ विदेशी खेळाडूंसाठी स्लॉट आहेत.

ट्रेंट बोल्ट हा सुरूवातीच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. बुमराहची गोलंदाजी आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे बोल्ट आणि बुमराहची जोडी प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. २० षटकांमधील ८ षटकं बुमराह टाकणार म्हणजे समोरच्या संघातील फलंदाज किती काळ मैदानावर टिकणार हा मोठा प्रश्न असणार आहे. बोल्ट संघात पुन्हा सामील झाल्याने मुंबई इंडियन्सचा संघ अधिक मजबूत झाला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians bought trent boult with 12 05 crores in ipl auction 2025 bdg