Mumbai Indians buy Will Jacks for 5 25 crores in IPL 2025 Auction : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहिला मिळाले. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे आरसीबीने विल जॅकसाठी आरटीएम कार्ड न वापरल्याच्या निर्णयाची, मुंबई इंडियन्सने या संधीचा फायदा घेतला आणि विल जॅकला 5.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. हा निर्णय क्रिकेट जगता आणि चाहत्यांमध्ये आश्चर्याचा कारण ठरला आहे. कारण विल जॅकने आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती.

विल जॅक्सने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती आणि त्याच्यावर पहिली बोली मुंबई इंडियन्सने लावली होती. पंजाब किंग्स जॅकसाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यास तयार होते, परंतु मुंबई इंडियन्सने मनाशी निर्धार केला होता की जॅक्सला खरेदी करायचे. अखेरीस, मुंबईने 5.25 कोटींची बोली लावून इंग्लंडच्या या प्रभावी अष्टपैलू खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

आरटीएम असतानाही आरसीबीने दिला स्पष्ट नकार –

आरसीबीकडे आरटीएम कार्ड शिल्लक होते आणि जेव्हा आरसीबी व्यवस्थापनाला 5.25 कोटी रुपयांच्या बोलीनंतर आरटीएम वापरणार आहात का? असे विचारण्यात आले तेव्हात्यांनी स्पष्ट ‘नाही’ म्हणून मान हलवली. विशेषत: आरसीबीचे चाहते या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहेत. जेव्हा मुंबई इंडियन्सने जॅक्सला खरेदी केले, तेव्हा आकाश अंबानी आपल्या खुर्चीवरून उठला आणि आरसीबी व्यवस्थापनाशी हस्तांदोलन करायला गेला. आकाशला माहित होते की विल जॅक हा ‘मॅचविनर’ खेळाडू आहे. ज्याने आयपीएळ 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकांसह 230 धावा केल्या होत्या. गेल्या मोसमात त्याचा स्ट्राईक रेट 175 पेक्षा जास्त होता.

हेही वाचा – IPL 2025 Auction : आयपीएल लिलावात ‘बिहारी बाबू’ मालामाल! मुकेश कुमार आणि आकाश दीपवर लागली करोडोंची बोली

आरसीबीचे चाहतेही संतापले –

आरसीबीने विल जॅकवर आरटीएम कार्ड न वापरल्याने चाहते आरसीबी व्यवस्थापनावर निराश झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, आरसीबी संघाचे व्यवस्थापन जोकरांनी भरलेले आहे. दुसरा चाहता म्हणाला, आरसीबीने एमआयच्या टीम डेव्हिडला विकत घेतले होते. आता मुंबईने आरसीबीच्या विल जॅक्सला खरेदी करुन हिशोब चुकता केला. अशा प्रकारच्या पोस्टचा सोशल मीडियावर महापूर आला आहे.

Story img Loader