Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights: सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची नाव गटांगळ्या खाताना दिसत आहे. मंगळवारी (३० एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून झालेल्या पराभवानंतर प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या त्यांच्या संधी मावळताना दिसत आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या एमआय विरुद्ध एलएसजी सामन्यात यजमानांनी मुंबईला पराभूत केले. एमआयचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवशीच चार गडी राखून एलएसजीने एमआयवर मात केली. कालच्या धक्कादायक पराभवानंतर अजूनही मुंबई इंडियन्सला प्लेऑफ गाठण्याची संधी मिळू शकते का, त्यासाठी नेमकी कशी समीकरणे जुळून यावी लागतील, हे ही पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स हायलाईट्स (MI vs LSG Match Highlights)

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी लखनऊच्या गोलंदाजांसमोर फार लवकरच गुडघे टेकल्याने त्यांना फक्त १४४ धावा पूर्ण करता आल्या होत्या. सुरुवातीलाच २७ धावांमध्ये ४ विकेट्स गमावलेल्या मुंबईच्या संघात इशान किशन (३२) आणि नेहल वढेरा (४६) सोडल्यास बाकी कुणालाच समाधानकारक कामगिरी सुद्धा करता आली नव्हती. लखनऊ सुपर जायंट्सकडून मोशीन खानने दोन विकेट्स घेतल्या तर दीपक हुडा वगळता प्रत्येकाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तुलनेने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या एलएसजीसाठी १४५ धावांचे ध्येय तसे सोपे होते. तशी एलएसजीच्या फलंदाजीच्या वेळी नुवान तुषाराने अर्शिन कुलकर्णीला गोल्डन डकवर बाद केल्याने मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली चालू झाली होती. मात्र, त्यानंतर कर्णधार केएल राहुल (२८) आणि मार्कस स्टॉइनिस (६२) यांनी जोरदार फलंदाजी करत सामना परत हाती घेतला. दीपक हुडा (१८) आणि निकोलस पूरन (१४*) यांनी सुद्धा लक्ष्य गाठण्यात खारीचा वाटा उचलला. यासह इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मध्ये एलएसजी सहावा विजय मिळवून १२ पॉईंट्ससह प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करण्याच्या मार्गावर आहे.

मुंबई इंडियन्स तरच गाठू शकणार प्लेऑफ!

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मध्ये मुंबईचा लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा पराभव हा त्यांचा स्पर्धेतील सातवा पराभव होता. केवळ ३ विजयांसह ते गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहेत, त्यांचा नेट रन रेट (-0.272) सुद्धा खराब आहे.

हे ही वाचा<< “विराट कोहली आमचा जावई, पण वाईट वाटतं की..”, शाहरुख खानने सांगितलं नातं, म्हणाला, “बाकी खेळाडूंपेक्षा त्याला…”

IPL Point Table

(फोटो: लोकसत्ता)

मुंबई इंडियन्सला आता प्ले ऑफ गाठण्यासाठी अशक्य ते शक्य करून दाखवावे लागणार आहे. त्यांना स्पर्धेतील त्यांचे शेवटचे चारही सामने जिंकणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांच्याकडे १४ पॉईंट्स येतील. हे सर्व विजय मोठ्या फरकाने सुद्धा जिंकावे लागतील ज्यामुळे त्यांचा निगेटिव्ह नेट रन रेट सुद्धा सुधारेल. एकही पराभव हा संघाला आयपीएल २०२४ च्या स्पर्धेतून बाहेर फेकू शकतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians can reach playoff of ipl 2024 point table after mi vs lsg highlights how hardik pandya team can earn 14 points svs