Mumbai Indians IPL 2024: आयपीएलमधील चॅम्पियन संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळक आहे. सर्वात पहिल्यांदा आयपीएलची विक्रमी ५ जेतेपद मुंबईने आपल्या नावे केली. .यंदाच्या हंगामात सुरूवातीच्या सलग तीन पराभवांनंतर मुंबईने चौथा सामना जिंकला. यासह आतापर्यंत मुंबईने आठ सामन्यांपैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ यंदा ६ गुणांसह सातव्या स्थानी आहे. मुंबईची कामगिरी पाहता या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचण्याचा रस्ता संघासाठी अवघड आहे. पण संघाने २०२४ मधील कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास प्लेऑफमध्ये नक्कीच पोहोचू शकतात.

मुंबई इंडियन्सचा संघ पराभवाने आपल्या मोहिमेला सुरूवात करतो. सुरूवातीचे काही सामने सलग गमावल्यानंतर मुंबईचे खेळाडू अखेरच्या टप्प्यात आपली जबरदस्त कामगिरी दाखवून देतात. मुंबई संघाने २०१३ मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आणि पुढील वर्षात २०१४ च्या सुरूवातीला संघाची सुरूवात प्रचंड निराशाजनक होती. संघाने सलग पाच सामने गमावले. त्यामुळे चॅम्पियन असलेल्या मुंबईचं आता काही खरं नाही असं चित्र होतं. पण मुंबईने जोरदार पुनरागमन करत पुढील ९ पैकी ७ सामने जिंकत प्लेऑफमध्ये धडक मारली. पण प्लेऑफमध्ये चेन्नईकडून झालेल्या पराभवामुळे संघ बाहेर पडला. त्यामुळे २०१४ प्रमाणे आता दहा वर्षांनंतर २०२४ मध्ये मुंबई इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
BEST employees and passengers protest
बेस्ट कर्मचारी, प्रवाशांचे निषेध आंदोलन
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

हेही वाचा- IPL 2024: ‘गार्डनमध्ये फिरणाऱ्या मुला’च्या शतकानंतर रोहितने मैदानातच घेतली गळाभेट, यशस्वीने रोहितला पाहताच… VIDEO व्हायरल

इतकेच नव्हे तर मुंबईने २०१५ मध्ये सुरूवातीचे चार सामने गमावले होते आणि त्यानंतर थेट विजेतेपद पटकावतच आपल्या मोहिमेची सांगता केली. त्यामुळे मुंबईचा हा रेकॉर्ड पाहता मुंबई नक्कीच पुनरागमन करू शकते अशी चाहत्यांना आशा आहे. पण यंदाच्या हंगामात मुंबईला पुनरागमन करायचे असेल तर इथून पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. तर सोबत नेट रन रेटवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. विजयासोबतच मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

२०१४, २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडे होते. यंदाच्या हंगामात मुंबईचा कर्णधार हा हार्दिक पंड्या आहे. कर्णधार पंड्या आयपीएलच्या या मोसमात आपल्या खराब फॉर्मशीदेखील झगडत आहे. त्यामुळे पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स २०१४ प्रमाणे पुनरागमन करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader