Hardik Pandya argument video : आयपीएल २०२४ मधील ४३वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज मैदानात आले आणि त्यांनी वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. दिल्लीने अवघ्या १० षटकांत १२८ धावा केल्या होत्या. त्यानंतर मर्यादीत २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावांचा डोगर उभारला. यादरम्यान रोहित शर्मा अनेकदा क्षेत्ररक्षण करताना दिसला. यानंतर एका मुद्द्यावरून हार्दिक पंड्या अंपायरशी वाद घालताना दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिकने लाइव्ह सामन्यात अंपायरशी का भिडला?
हार्दिक पंड्या आधीच दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीने त्रस्त दिसत होता. यानंतर जेव्हा विकेट पडली तेव्हा दिल्लीच्या फलंदाजांना मैदानात उतरण्यास बराच वेळ लागत होता. यामुळे हार्दिकला आणखी राग आला आणि त्याने अंपायरडे जाऊन या प्रकरणाची तक्रार केली. यादरम्यान हार्दिक पंड्या अंपायरशी वाद घालताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरे तर दिल्लीचे फलंदाज मैदानात उशिरा येणे हे मुंबई इंडियन्सचे नुकसान आहे. कोणत्याही संघाला आपला डाव संपवण्याची मर्यादा असते. जर त्या कालाावधीत डाव संपला नाही तर त्यांना स्लो ओव्हर रेटसाठी दंड आकारला जातो. त्याचबरोबर शेवटच्या षटकांमध्ये क्षेत्ररक्षण लावताना मर्यादा येतात. ज्यामुळे ३० यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण लावताना कमी खेळाडू उपलब्ध असल्याने क्षेत्ररक्षण विस्कळीत होते.
सामन्याबद्दल बोलायचे, तर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य दिले . दिल्लीने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीसाठी फ्रेझरने तुफानी खेळी केली. त्याने २७ चेंडूत ८४ धावा केल्या. या काळात त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. स्टब्सने ४८ धावांची नाबाद खेळी खेळली. अभिषेक पोरेलने ३६ धावांचे योगदान दिले.
शाई होप ४१ धावा करून बाद झाला. अक्षर पटेल ११ धावा करून नाबाद राहिला. कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईसाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने २ षटकात ४१ धावा दिल्या. ल्यूक वुडने ४ षटकात ६८ धावा देत १ विकेट घेतली. जसप्रीत बुमराह सर्वात किफायतशीर ठरला. त्याने ४ षटकात ३५ धावा देत १ विकेट घेतली. पियुष चावलाने ३६ धावांत १ विकेट घेतली.