दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी अनपेक्षित खेळ करुन दाखवत पहिल्याच सामन्यात मुंबईला धूळ चारली. तब्बल चार गडी राखून दिल्लीने मुंबईचा पराभव केलाय. या विजयाचे शिल्पकार ललित यादव , अक्षर पटेल असून दिल्लीच्या चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झालाय. तर दुसरीकडे पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने मुंबई चाहते नाराज असून गोलंदाज डॅनियल सॅम्सला दूषणे देत आहेत..

डॅनियल सॅम्सने एखा षटकात दिल्या २४ धावा

डॅनियल सॅम्स हा मुंबईचा प्रभावी असा गोलंदाज आहे. संघाचा विजय आणि पराभव याच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे. मात्र मुंबईने १७७ धावांचे तगडे आव्हान उभे करुनही सॅम्सच्या खराब खेळामुळे मुंबईला पराभावाचे तोंड पाहावे लागले आहे. त्याने एका षटकात दिल्लीला तब्बल २४ धावा दिल्या. सॅम्सने एकूण चार षटके टाकले. या चार षटकांत त्याने तब्बल ५७ धावा दिल्या. विशेष म्हणजे त्याला एकाही खेळाडूला बाद करता आले नाही. त्याच्या याच खराब खेळामुळे मुंबईला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असं मुंबईचे चाहते म्हणत आहेत.

याआधी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी दिमाखदार कामगिरी करत दिल्लीसमोर १७८ धावांचे लक्ष्य उभे केले. या धवांचा पाठलाग उतरण्यासाठी उतरलेले दिल्लीचे फलंदाज मात्र चांगली कामगिरी करु शकले नाही. पृथ्वी शॉ आणइ टीम सेफर्ट सलामीला मैदानात उतरले. मात्र दिल्लीच्या अवघ्या ३० धावा असताना टीम बाद झाला. त्यानंतर लगेचच मनदीप सिंगही शून्यावर तंबूत परतला. पुढे दोन धावा केल्यानंतर दिल्लीचा ऋषभ पंतच्या रुपात आणखी एक फलंदाज बाद झाला. सलग तीन गडी बाद झाल्यानंतर दिल्लीची ३२ धावांवर तीन गडी बाद अशी दयनीय अवस्था झाली होती.

त्यानंतर मात्र पृथ्वी शॉने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने २४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोष षटकार लगावत ३८ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी आलेल्या रॉवमन पॉवेलने मात्र पूर्णपणे निराशा केली. तो शून्यावर बाद झाल्याचा दिल्लीला मोठा फटका बसला. शार्दुल ठाकुरही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने ११ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने २२ धावा केल्या. शार्दुल पहिल्यापासून आक्रमकपणे खेळत होता. मात्र तोच आक्रमकपणे पुढे त्याला भोवला. तो झेलबाद झाला. शार्दुल बाद झाल्यानंतर मात्र अक्षर पटेल आणि ललित यादव या जोडगोळीने संघाला तारलं. सामना हातातून जाण्याची शक्यता असताना या जोडीने चांगला खेळ केला आणि दिल्लीला विजय मिळवून दिला.

Story img Loader