मुंबई इंडियन्सने आपल्या संघाच्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या एका वार्षिक मासिकाचे अनावरण केले. अशा स्वरुपाच्या मासिकाची निर्मित्ती करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील पहिलाच संघ आहे. हे मासिक एकूण ६० पृष्ठांचे असून, मुखपृष्ठावर सचिन तेंडुलकरचे आकर्षक छायाचित्र आहे. मुंबई इंडियन्सच्या जगभरातील चाहत्यांना हे मासिक समर्पित करण्यात आले आहे. मासिकात मुंबई इंडियन्सचे खेळाडू, संघाचे डावपेच, आकडेवारी यांच्यासह वाचकांसाठी काही स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांना मुंबई इंडियन्सच्या गुडीज मिळणार आहे.

Story img Loader