Arjun Tendulkar Batting Video Viral : सनरायझर्स हैद्राबादच्या भुवनेश्वर कुमारला बाद करून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पहिल्या विकेटवर शिक्कमोर्तब केलं. आयपीएल करिअरची पहिली विकेट घेतल्यानंतर अनेकांनी अर्जुनला शुभेच्छा दिल्या. आयपीएलमध्ये अर्जुनच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. पण आता तमाम क्रिकेटप्रेमींची अर्जुनची फलंदाजी पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुनच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्जुनने रणजीच्या पदार्पण सामन्यात शतक ठोकलं होतं. त्यामुळे अर्जुनकडून फलंदाजीची अपेक्षा आहे. अशातच मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर अर्जुनच्या फलंदाजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन फलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळत आहे. चेंडूवर मोठे फटके मारून गोलंदाजांचा समाचार घेताना अर्जुन या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – अर्जुन तेंडुलकरने २४ नंबरची जर्सी घालून IPL मध्ये पदार्पण का केलं? सचिन तेंडुलकरशी खास कनेक्शन, जाणून घ्या नेमकं कारण

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही आशा आहे की, अर्जुनने लवकरात लवकर फलंदाजीचाही जलवा दाखवावा. अर्जुन तेंडुलकर २०२१ मध्ये मुंबई इंडियन्ससोबत जोडला गेला होता. परंतु, मागील दोन वर्षात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. केकेआरविरुद्ध या सीजनमध्ये अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात अर्जुनने २ षटाकात १७ धावा दिल्या. तर हैद्राबादविरोधात झालेल्या सामन्यात अर्जुनने २.५ षटकात १८ धावा देत १ विकेट घेतली.