Rohit Sharma And Gautam Gambhir Meeting Video Viral : आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादविवादामुळं संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ माजली होती. कोहली टीम इंडियाचा आयकॉन प्लेयर आहे. तर गंभीरनेही टीम इंडियाला दोन्ही वर्ल्डकप जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. गंभीरने भारतासाठी टी-२० आणि वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकण्याची चमकदार कामगिरी केली होती. मात्र, कोहली-गंभीर वादानंतर चाहत्यांनी आणि दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहली आणि गंभीर यांच्यात यापूर्वीही खटके उडाले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात दोघांमध्ये झालेली शाब्दिक चकमक ताजी असतानाच आता नवीन व्हिडीओ समोर आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्श गौतम गंभीरला भेटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

नक्की वाचा – MI चा धाकड फलंदाज नेहल वढेराला ‘ती’ चूक पडली महागात, संघ व्यवस्थापनाने विमानतळावर दिली शिक्षा, Video होतोय व्हायरल

लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. दोघेही दिग्ग्ज खेळाडू हसत हसत चर्चा करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. परंतु, रोहित आणि गौतमला एकत्र पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. या व्हिडीओला चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आज मंगळवारी मुंबई आणि लखनऊ यांच्यात सामना रंगणार आहे.

दोन्ही संघ प्ले ऑफ शर्यतीत आहेत. मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात विजय मिळाला, तर गुणतालिकेत मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहचेल. सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादचा पराभव करून प्ले ऑफ मध्ये प्रेवश करणारा गुजरात टायटन्स पहिला संघ बनला आहे. सध्याच्या घडीला मुंबई, चेन्नई आणि लखनऊचा संघ प्ले ऑफमध्ये टॉप ३ च्या शर्यतीत आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians skipper rohit sharma meets lucknow super giants mentor gautam gambhir video clip viral on twitter mi vs lsg ipl 2023 nss