Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या ५ हंगामात मुंबई इंडियन्सला एकदाही जेतेपद पटकावत आले नव्हते. यानंतर २०१३ साली पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ठरला. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये जेतेपद पटकावले. यंदा आयपीएल २०२५ साठी २४ आणि २५ नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स आपल्या जुन्या खेळाडूंना विकत घेऊन पुन्हा असाच संघ बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. मुंबई संघ कोणत्या पाच खेळाडूंना पुन्हा खरेदी करू शकतो? जाणून घेऊया.
१. ट्रेंट बोल्ट
ट्रेंट बोल्टने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून अप्रतिम कामगिरी केली होती. तो २०२० मध्ये फ्रँचायझीमध्ये सामील झाला होता आणि पहिल्याच सत्रात संघाल चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होता. ट्रेंट बोल्टने दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना एकूण ३८ विकेट्स घेतल्या. या दोन हंगामात त्याने बुमराहच्या साथीने विरोधी संघांच्या मनात दहशत निर्माण केली होती. तो मागील काही हंगामापासून राजस्थान रॉयल्सचा संघाचा भाग होता, पण आता त्याला रिलीज केले आहे.
२. कृणाल पंड्या
एकेकाळी हार्दिक आणि कृणाल पंड्या मुंबई इंडियन्स संघाचे महत्त्वाचे शिलेदार होते, हार्दिक पंड्याप्रमाणेच कृणाल पंड्या हा मुंबई इंडियन्सने घडवलेला खेळाडू आहे. तो २०१६ ते २०२१ या हंगामात फ्रँचायझीचा भाग होता आणि तीन वेळा चॅम्पियन बनण्यात त्याने भूमिका बजावली. कृणाल पंड्या मागील तीन हंगामात लखनौ सुपर भाग होता, पण यावेळी त्याला रिलीज करण्यात आले आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो बॅट आणि बॉल या दोन्हीने पण संघासाठी योगदान देतो.
३. जोस बटलर
जोस बटलर टी-२० मध्ये फिनिशर म्हणून काम करत होता. मुंबई इंडियन्सने बटलरला पहिल्यांदाच सलामीसाठी मैदानात उतरवले होते. तेव्हापासून इतिहास बदलला. मागील काही वर्षांत तो राजस्थान रॉयल्ससाठी सलामी देत होता. मात्र यंदा त्याला राजस्थानने रिलीज केले आहे. अशा परिस्थितीत मुंबई त्याला विकत घेण्यासाठी जाऊ शकते. तो सध्या इंग्लंडच्या मर्यादित षटकांतील संघाचा कर्णधार आहे.
४. राहुल चहर
युवा खेळाडू राहुल चहर हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. मुंबईसाठी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. मुंबई सोडल्यानंतर त्याची कामगिरी सातत्याने घसरत आहे. राहुल स्वत: त्याच्या जुन्या फ्रँचायझीमध्ये परत येऊ इच्छितो. राहुल चहर मागील दोन हंगामात पंजाब किंग्ज संघााचा भाग होत, आता त्याला रिलीज करण्यात आले आहे. यापूर्वी राहुल चहर २०२१ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता.
५. क्विंटन डी कॉक
क्विंटन डी कॉक हा मुंबई इंडियन्सचा सलामीवीर होता, जो २०१९ आणि २०२० मध्ये मंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणारा महत्त्वाचा खेळाडू होता. दोन्ही हंगामात त्याने रोहित शर्मासह सलामी देताना ५०० हून अधिक धावा केल्या होता. मुंबई त्याला पुन्हा एकदा विकत घेऊन यष्टिरक्षकाची जबाबदारी देऊ इच्छित आहे. कारण त्याला लखनौ सुपरजायंट्स संघाने रिलीज केले आहे.