MI vs KKR Highlights, Toss Controversy: जवळपास तीन आठवड्यांपूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान नाणेफेकीत मुद्दाम चूक केल्याचे म्हणत वादाला तोंड फोडले होते. सामनाधिकारी जवागल श्रीनाथच्या कथित कृत्याबद्दल सोशल मीडियावरही प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. काही दिवसांनंतर डू प्लेसिस आयपीएल सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला सुद्धा या घटनेबद्दल सांगताना दिसला होता. नाणेफेकीचा वाद ज्यामुळे झाला त्या व्हायरल व्हिडीओमध्ये , एमआयचा कर्णधार हार्दिकने त्याच्या डोक्याहुन उंचावर नाणे फेकतो आणि नाणं उपस्थित असलेल्यांच्या खूप मागे पडतं असं दिसतं. हे घडल्यावर श्रीनाथने नाणे उचलताना मुंबईच्या बाजूने बाजू बदलली होती असा आरोप करण्यात येत होता, असेच काहीसे प्रकरण काल मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी घडल्याचे समजतेय.

फाफ डू प्लेसिसच्या आरोपानंतर व्हिडीओ व्हायरल होत असताना ठोस पुरावा नसला तरी सामनाधिकाऱ्यांनी काही बदल स्वतःहून स्वीकारले होते. म्हणजेच नाणेफेकीच्या वेळी कॅमेरा नाण्यावर झूम इन केला जात होता. पण शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान कॅमेरा झूम इन करण्याआधीच सामनाधिकारींनी नाणे उचलले.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
Pushpa 2 Box Office Collection Day 3
Pushpa 2 : ‘पुष्पा’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे, आतापर्यंतची कमाई किती?

नाणं याही वेळेस हार्दिकनेच वर फेकले होते, आधीप्रमाणेच ते खूप उंचावर फेकल्याने मागे जाऊन पडले आणि श्रेयस अय्यरने कॉल दिला होता. नाणे पडताच ते पंचांनी उचलले व हार्दिकने नाणेफेक जिंकल्याचे घोषित केले. कॅमेरा झूम होण्याआधीच असं जाहीर केल्यावरून केकेआरच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया इथे पाहा

हे ही वाचा<< “रोहित शर्मा बाद होण्याचा ‘हा’ पॅटर्न झालाय, तिथे शाहीन आफ्रिदी..”, विश्वचषकाआधी कर्णधाराला वासिम जाफरचा सल्ला

दरम्यान, इतकं सगळं घडूनही अखेरीस मुंबई इंडियन्सला शुक्रवारी आयपीएल २०२४ च्या हंगामातील आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाताने काल वानखेडे स्टेडियमवर MI विरुद्ध १२ वर्षांतील पहिला IPL विजय नोंदवला. आता या विजयानंतर कोलकाताचा संघ प्ले ऑफच्या दिशेने पुढे व एमआय संघ अगदीच मागे ढकलला गेला आहे. सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या तर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहेत.

Story img Loader