MI vs KKR Highlights, Toss Controversy: जवळपास तीन आठवड्यांपूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान नाणेफेकीत मुद्दाम चूक केल्याचे म्हणत वादाला तोंड फोडले होते. सामनाधिकारी जवागल श्रीनाथच्या कथित कृत्याबद्दल सोशल मीडियावरही प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. काही दिवसांनंतर डू प्लेसिस आयपीएल सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला सुद्धा या घटनेबद्दल सांगताना दिसला होता. नाणेफेकीचा वाद ज्यामुळे झाला त्या व्हायरल व्हिडीओमध्ये , एमआयचा कर्णधार हार्दिकने त्याच्या डोक्याहुन उंचावर नाणे फेकतो आणि नाणं उपस्थित असलेल्यांच्या खूप मागे पडतं असं दिसतं. हे घडल्यावर श्रीनाथने नाणे उचलताना मुंबईच्या बाजूने बाजू बदलली होती असा आरोप करण्यात येत होता, असेच काहीसे प्रकरण काल मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी घडल्याचे समजतेय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा