Which teams will benefit from MI’s win against SRH : आयपीएलचा १७वा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज ६ मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. संघाला ८ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई आजचा सामना हरल्यास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या विजयाचा फायदा गुणतालिकेतल्या या ६ संघांना होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर विराजमान –

आयपीएल २०२४ मध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघाने १० सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि १२ गुण आहेत. संघ चौथ्या क्रमांकावर आहे. जर संघाने आजचा सामना जिंकला तर त्याचे १४ गुण होतील. या स्थितीत इतर संघांना प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. पण हैदराबादचा मुंबई विरुद्झ पराभव झाल्याल्यास गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सला फायदा होऊ शकतो. या संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. सर्वप्रथम, हैदराबादचे ११ सामने होतील आणि त्यांचे गुण केवळ १२ राहतील. दुसरा, ज्या सहा संघांना फायदा होईल. त्यांनी ११-११ सामनेही खेळले आहेत.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य

चेन्नई सुपर किंग्ज –

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा संघ सध्या १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे सीएसके संघ तिसऱ्या क्रमांकावर राहील. हैदराबाद जिंकल्यास एका स्थानाने खाली घसरेल.

हेही वाचा – CSK vs PBKS : ‘…तर एमएस धोनीने खेळू नये,’ हरभजन सिंगचे माहीबाबत मोठं वक्तव्य

लखनऊ सुपर जायंट्स –

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत. पाच सामन्यांत पराभव झाला असून संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. संघाची निव्वळ धावसंख्या उणे ०.३७२ आहे. जर हैदराबाद हरले तर त्याचे सामने ११ होतील, परंतु गुण फक्त ११ राहतील. एलएसजीचीही तीच परिस्थिती आहे. त्यानंतर लखनऊ संघाला आपला पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.

दिल्ली कॅपिटल्स –

दिल्ली कॅपिटल्स संघाने ११ सामन्यांतून ५ जिंकले असून त्यामुळे त्यांचे १० गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी, अव्वल संघांनी त्यांचे सामने गमावणे आवश्यक आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्धचासामना गमावल्यास दिल्लीसाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

हेही वाचा – VIDEO : राहुलने सुपरमॅनप्रमाणे हवेत झेपावत घेतला श्रेयसचा अप्रतिम झेल, ‘कॅच’ पाहून गोलंदाजाने जोडले हात

आरसीबी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स –

आरसीबी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत ४-४ सामने जिंकले आहेत. या सर्व संघांचे ८-८ गुण आहेत. हे संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मग त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावावेत. ज्याची सुरुवात आजच्या सामन्यापासून होऊ शकते. कारण हैदराबादचे सध्या १२ गुण आहेत.

Story img Loader