Arjun Tendulkar Arm Wrestling Video Viral : मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबईचा मार्ग थोडाफार खडतर झाला असला, तरीही संघातील खेळाडू सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन मैदानात सराव करताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामातही विजय संपादन करण्याचे वेध लागले आहेत. मुंबई इंडियन्सची पुढील लढत रविवारी सनरायझर्स हैदराबादविरोधात होणार आहे.
तत्पूर्वी, रोहित शर्माच्या पलटणमधील अष्टपैलू युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्जुनचा आर्म रेस्टलिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसंच कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विष्णू विनोद हे खेळाडूही जिममध्ये कंबर कसताना व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.लखनऊ सुपर जायंट्सविरोधात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता.
इथे पाहा व्हिडीओ
त्या सामन्याआधी अर्जुन तेंडुलकरला कुत्र्याने चावा घेतल्याचं समोर आलं होतं. अर्जुनने स्वत: याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, अर्जुनला हैदराबादविरोधात होणाऱ्या सामन्यात प्लेईंग ११ मध्ये संधी मिळते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अर्जुनने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत चार सामने खेळले. या युवा खेळाडूनं कमाल दाखवून चार सामन्यात ३०.६६ च्या सरासरीनं आणि ९.३५ च्या इकॉनोमीनं ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसंच एका सामन्यात त्याने १३ धावाही केल्या आहेत.