Kwena Maphaka recorded embarrassing record in IPL 2024 : मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना विक्रमी २७७ धावा ठोकल्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संघाचा हा विक्रमही आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाने एक अतिशय लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. क्वेना माफाकाच्या षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात क्वेना मफाकाने गोलंदाजी करताना ४ षटकात ६६ धावा दिल्या. क्वेना मफाकाला एकही विकेट मिळाली नाही आणि या काळात त्याचा इकॉनॉमी रेटही १६.५० होता. आयपीएल पदार्पणातील कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वात खराब गोलंदाजी आहे.

क्वेना मफाकाने ११ वर्षे जुना विक्रम मोडला –

आयपीएलमध्ये गोलंदाजाने ४ षटकात ६६ धावा देणे ही आयपीएलच्या इतिहासातील पदार्पणातील सर्वात खराब आकडेवारी आहे. क्वेना मफाकाने या बाबतीत मायकेल नेसरचा विक्रम मोडला आहे. मायकेल नेसरने आयपीएल २०१३ मध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पण करताना हा विक्रम केला होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध गोलंदाजी करताना ४ षटकात ६२ धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

आता क्वेना मफाकाने मायकेल नेसरचा ११ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाने अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, परंतु या १७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने २०२४ अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत ९.७१ च्या सरासरीने २१ विकेट घेतल्या होत्या. त्याला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते.

हेही वाचा – IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

आयपीएल पदार्पणातील सर्वात खराब गोलंदाजीचे आकडे –

०/६६ – क्वेना मफाका (एमआय) वि एसआरएच, २०२४
०/६२ – मायकेल नेसर (पीबीकेएस) वि आरसीबी, २०१३
०/५८ – मशरफी मोर्तझा (केकेआर) वि डेक्कन चार्जर्स, २००९
०/५६ – प्रयास रे बर्मन (आरसीबी) वि एसआरएच, २०१९

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians young fast bowler kwena maphaka has recorded the most embarrassing record in the history of ipl vbm