आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४० वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने मोठे फटके लगावत सामना खिशात घातला. दरम्यान या सामन्यामध्ये परभव झाल्यामुळे हैदरबादचे चाहते आणि खेळाडू प्रचंड नराज आहेत. हैदराबादचा प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांना तर राग अनावर झाला. त्यांनी डगआऊटमध्येच आपला राग व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> IPL 2022 DC vs KKR : आज दिल्ली-कोलकाता आमनेसामने, कोणाची होणार सरशी? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

राशिद खान-राहुल तेवतिया जोडीने कमाल केली

गुजरात टायटन्स आणि हैदराबाद यांच्यात शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीची लढत झाली. गुजरातच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. या सामन्यावर हैदराबाद निर्विवाद वर्चस्व गाजवेल असे वाटत असताना या जोडीने मोठे फटके लगावत विजयावर नाव कोरलं. गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात म्हणजेच सहा चेंडूंमध्ये २२ धावांची गरज होती. यावेळी राशिद आणि राहुल यांनी दबावाला झुगारून षटकार सामना गुजरातच्या नावावर केला.

हेही वाचा >> SRH vs GT : उमरान मलिकच्या ‘रफ्तार’पुढे गुजरात संघ गारद, पठ्ठ्याने एकट्याने घेतल्या पाच विकेट्स

मुथय्या मुरलीधरन का चिडले ?

विजयासाठी गुजरातला सहा चेंडूंमध्ये २२ धावांची गरज होती. तर दुसरीकडे मार्को जानसेन याच्याकडे भेदक मारा करण्याची क्षमता असल्यामुळे हैदराबदचा कर्णधार केन विल्यम्सनने त्याला शेवटचे षटक टाकण्यासाठी सांगितले. मात्र जानसेनने दबावात येऊन चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली. त्याने फुल लेंथ असलेले चेंडू टाकले. या संधीचा फायदा तेवतिया आणि राशित खान या जोडीने घेतला. शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तेवतियाने षटकार लगावला. त्यानंतर एक धाव काढत राशिद खानकडे स्ट्राईक दिली. त्यानंतर राशिद खानने तीन षटकार लगावत गुजरातला विजय मिळवून दिला. हातात आलेला सामना जानसेनच्या खराब गोलंदाजीमुळे गमवावा लागल्यामुळे मुथय्या मुरलीधरन यांचा परा चढला. त्यांनी डगआऊटमध्येच आपला राग व्यक्त केला. त्यांनी खुर्चीवरुन उभे राहत मार्को जानसेवर त्रागा केला.

हेही वाचा >> तेवतिया-राशिद खाननं करून दाखवलं; शेवटच्या चेंडूवर गुजरातचा हैदराबादवर चित्तथरारक विजय

मुरलीधरन यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने पाच गडी राखून विजय मिळवला.

Story img Loader