Rishabh Pant reply to Sunil Gavaskar about Delhi Capitals ahead IPL 2025 : ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससोबत विभक्त होण्याबाबत मौन सोडले आहे. त्याने एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, त्याने पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडलेली नाही. ऋषभ पंतने स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये सुनील गावस्कर आयपीएल २०२५ मेगा लिलावापूर्वी दिल्लीने त्यांचा कर्णधार कायम न ठेवण्याचे कारण स्पष्ट करत होते.
व्हिडीओमध्ये सुनील गावस्कर म्हणाले की, मला विश्वास आहे की दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांच्यात यष्टीरक्षक-फलंदाजच्या रिटेन्शन फीबाबत मतभेद असू शकतात. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मेगा लिलावात कॅपिटल्स ऋषभ पंतला परत घेण्याचा प्रयत्न करेल, असेही गावस्कर यावेळी म्हणाले. त्यांच्या या व्हिडीओव प्रतिक्रिया देताना ऋषभ पंत म्हणाला, मी पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडलेली नाही.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
m
k
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “मला वाटते की दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या संघात ऋषभ पंत परत हवा आहे. कधी कधी, जेव्हा एखाद्या खेळाडूला कायम ठेवायचे असते, तेव्हा अपेक्षित फीबाबत फ्रँचायझी आणि खेळाडू यांच्यात वाटाघाटी होतात. काही खेळाडू ज्यांना त्यांच्या फ्रँचायझींनी कायम ठेवले आहे, त्यांनी नंबर एक रिटेन्शन फीची मागणी केली आहे. त्यामुळे साहजिकच मला वाटते की, तेथे काही मतभेद असू शकतात, परंतु मला वाटते की दिल्लीला ऋषभ पंत परत हवा आहे.”
ऋषभ पंतने सुनील गावस्करांना दिले प्रत्युत्तर –
u
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिलेल्या ऋषभ पंतने सुनील गावस्करांना प्रत्युत्तर दिले आहे. स्टार स्पोर्ट्सने एक्सवनर जो सुनील गावस्करांचा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर प्रतिक्रिया देऊन आपले रिटेन्शनबाबतचे मौन सोडले आहे. त्याने लिहिले, “मी निश्चितपणे सांगू शकतो की, मला रिटेन न करण्याचे कारण पैसा नव्हता.”
हेही वाचा – PCB : पाकिस्तानात क्रिकेटपटूंच्या हॉटेलला भीषण आग; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह?
दिल्ली कॅपिटल्सने कोणत्या खेळाडूंना रिटेन केले?
आयपीएलच्या महालिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये अक्षर पटेलला १६.५ कोटी रुपये, कुलदीप यादवला १३.५ कोटी रुपये, दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू ट्रिस्टन स्टब्सला १० कोटी रुपये आणि अनकॅप्ड यष्टीरक्षक अभिषेक पोरेलला ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आले आहे