संघाचा हुकमी एक्का सुनील नरिनला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर यश मिळालेल्या कोलकाता नाइट रायडर्सला शुक्रवारी पुन्हा धक्का बसला. नरिनला गोलंदाजीच्या संशयास्पद शैलीच्या भोवऱ्यात सापडल्याने रविवारच्या सामन्याला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोलकाताला रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत नरिनशिवाय खेळावे लागणार आहे.
फलंदाजीत कोलकाताकडे गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादव ही मजबूत फळी आहे. दुसरीकडे राजस्थानकडे अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ आणि कर्णधार शेन वॉटसन हे दमदार फलंदाज आहेत. गोलंदाजीत प्रवीण तांबे, ख्रिस मॉरिस आणि जेम्स फॉकनर यांच्यावर भिस्त आहे.

Story img Loader