Suryakumar Yadav Fit for IPL 2024 : आयपीएलच्या १७व्या हंगामाची सुरुवात पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससाठी खास झालेली नाही. मुंबईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई पॉइंट टेबलमध्ये तळात १०व्या स्थानावर आहे. पण आता या सर्व अडचणी आणि संकटांमध्ये मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आयपीएल खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूर्याची अनुपस्थिती मुंबईसाठी अनेक समस्या निर्माण करत होती. सूर्याने मुंबईसाठी मागील हंगामातील बऱ्याच सामन्यात फिनिशरची भूमिका निभावली होती. क्षणात सामना बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. ‘इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्याला आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मुंबईचा पुढील सामना रविवारी (०७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसण्याची शक्यता आहे. सूर्या दिल्लीविरुद्ध खेळला तर वाईट टप्प्यातून जात असलेल्या मुंबईसाठी तो मोठा दिलासा देणारा ठरेल.

बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला बुधवारी खेळण्यास मान्यता दिली. तीन महिन्यांहून अधिक काळ तो क्रिकेट खेळलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि एनसीएच्या फिजिओंना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे आता पूर्णपणे दुखापतीतून सावरल्यानंतर सूर्यकुमार यादवला खेळण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा – आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’

सूर्यकुमार यादवची ३ वेळा फिटनेस टेस्ट –

बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, सूर्यकुमार यादवची तीनदा फिटनेस चाचणी झाली. सूत्राने सागितले, “सूर्यकुमार यादव आता तंदुरुस्त आहे. एनसीएने त्याला काही सराव सामने खेळायला लावले आणि त्यामध्ये तो चांगला दिसत होता. तो मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो. सूर्या जेव्हा एमआयमध्ये सामील होईल, तेव्हा तो १०० टक्के तंदुरुस्त आणि सामने खेळण्यासाठी तयार असावा, याची आम्हाला खात्री करायची होती. आयपीएलपूर्वीच्या पहिल्या फिटनेस टेस्ट दरम्यान तो १०० टक्के तंदुरुस्त वाटत नव्हता, त्यामुळे फलंदाजी करताना त्याला वेदना होतात की नाही हे पाहण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो.”

हेही वाचा – IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

सूर्यकुमार यादवची दुखापत –

दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवला घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सुरुवातीला तो सात आठवड्यांसाठी बाहेर पडला होता. तथापि, नंतर आणखी एक दुखापत झाली आणि त्याला हर्नियाचे ऑपरेशन करावे लागले, ज्यामुळे तो अद्याप मैदानापासून दूर होता. आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादवची उपलब्धता, मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक ठरेल, ज्यांनी सलग तीन पराभवांसह त्यांच्या आयपीएल २०२४ च्या मोहिमेची सुरुवात केली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याला प्रत्येक सामन्यात चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.