Nehal Wadhera Smashes Four-Six Video Viral : आयपीएल २०२३ चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये होत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला उतरलेल्या ईशान किशन आणि रोहितने मुंबईला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. परंतु, लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने भेदक मारा करून रोहितला ११ धावांवर बाद केलं आणि मुंबईला मोठा धक्का दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीनने चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. मात्र, या दिग्गज फलंदाजांनाही बाद करण्यात नवीनला यश आलं. परंतु, लखनऊच्या यश ठाकूरच्या शेवटच्या षटकात नेहल वढेराने दोन चौकार आणि ९१ मीटरचा एक गगनचुंबी षटकार ठोकला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. नेहलच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – सोशल मीडियावर ट्रोल झाला पण मैदान गाजवलं, नवीन उल हकने रोहितसह सूर्या-ग्रीनचा झंझावात थांबवला, Video झाला व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

यश ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर नेहलने चौकार मारला. त्यानंतर यशने दुसरा चेंडू निर्धाव फेकू कमबॅक केलं. मात्र, यशच्या तिसऱ्या चेंडूवर नेहलने मिड विकेटच्या दिशेनं ९१ मीटरचा गगनचुंबी षटकार ठोकला. त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवरही नेहलने मोठा फटका मारून चेंडू चौकाराच्या दिशेनं मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर नेहलला मोठा फटका मारता आला नाही आणि सहाव्या चेंडूवर यश ठाकूरने नेहलला झेलबाद केलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nehal wadhera smashes six and fours on yash thakur bowling watch video on twitter mi vs lsg nss